शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईतून काजू, बदाम चोरणाऱ्यास परळीमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:09 IST

अंबाजोगाई येथील एक किराणा दुकान फोडून काज, बदाम व इतर साहित्य चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगलसिंग हिरासिंग बावरी यास परळीत जेरबंद केले.

ठळक मुद्देगुन्ह्यासाठी गंगाखेडमधून चोरले होते वाहन : दोघांचा शोध सुरु

बीड : अंबाजोगाई येथील एक किराणा दुकान फोडून काज, बदाम व इतर साहित्य चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगलसिंग हिरासिंग बावरी यास परळीत जेरबंद केले.८ जानेवारी रोजी अंबाजोगाई येथील किराणा दुकानातील चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्याबात वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीआधारे या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परळी गाठली. परळीच्या शिवाजी चौकातील मंगलसिंग हिरासिंग बावरी (वय १९) यास शिताफिने ताब्यात घेतले. अंबाजोगाईतील किराणा दुकानातील चोरीचा गुन्हा त्याने व दोन साथीदारांनी मिळून केल्याची कबुली दिली. त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी राहुल धस, पो. नि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था. गुन्हे शाखेचे मुंजाबा कुव्हारे, सोजद पठाण, नरेंद्र बांगर, सिद्दीकी, सखाराम पवार, अतुल हराळे यांनी ही कामगिरी केली.एका तपासात दुसºया चोरीचा उलगडाअंबाजोगाई येथील गुन्हा करण्यासाठी मंगलसिंग व साथीदारांनी गंगाखेड येथून मालवाहू वाहन चोरले. तसेच गंगाखेड येथील एका कापडाच्या दुकानात चोरी केल्याचे मंगलसिंगने अधिक चौकशीत सांगितले. सदर वाहनही जप्त करण्यात आले असून आरोपीला अंबाजोगाई शहर ठाण्याकडे सोपविले आहे.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसtheftचोरीArrestअटक