शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात तहसील कर्मचाऱ्यांना कोंडून जप्त केलेले टिप्पर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील तहसीलदार रुपा चित्रक यांनी मंगळवारी रात्री बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारे हायवा टिप्पर जवळाला शिवारातून जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले होते. मात्र, निर्ढावलेल्या वाळू माफियांनी मध्यरात्रीच्या सुमारास चक्क तहसीलच्या कर्मचाºयांना कार्यालयात कोंडून जप्त केलेले टिप्पर जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना पाटोद्यात घडली. याप्रकरणी तहसीलदार चित्रक ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील तहसीलदार रुपा चित्रक यांनी मंगळवारी रात्री बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारे हायवा टिप्पर जवळाला शिवारातून जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले होते. मात्र, निर्ढावलेल्या वाळू माफियांनी मध्यरात्रीच्या सुमारास चक्क तहसीलच्या कर्मचाºयांना कार्यालयात कोंडून जप्त केलेले टिप्पर जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना पाटोद्यात घडली. याप्रकरणी तहसीलदार चित्रक यांच्या फिर्यादीवरून टिप्पर मालक आणि चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.

१० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तहसीलदार रूपा चित्रक या बीडमधील शासकीय कामकाज आटोपून माघारी पाटोद्याकडे निघाल्या होत्या. येताना रात्री ९.२० वाजताच्या सुमारास जवळाला शिवारात त्यांना एक हायवा टिपर (एमएच २३ डब्ल्यू ४००९) बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करताना आढळून आले. तहसीलदार चित्रक यांनी सदर टिप्पर थांबवून कागदपत्रे आणि परवान्याबाबत विचारणा केली असता टिप्पर मालक भाऊसाहेब खांडेकर याने घटनास्थळी येत परवाना नसल्याचे सांगितले.

त्यामुळे चित्रक यांनी टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले आणि रात्रपाळीवर असणाºया कोतवालाकडे ताबा देऊन चावी घेऊन निघून गेल्या. त्यानंतर मध्यरात्री १.४० वाजताच्या सुमारास टिप्पर मालक खांडेकर आणि चालक अमोल या दोघांनी कोतवाल सी.डी. चौरे आणि राहुल गिरी हे दोघे जुन्या तहसील कार्यालयात असताना त्यांना धाक दाखवून आणि धमक्या देत मुख्य दरवाजा बाहेरून लावला आणि जप्त केलेले टिप्पर घेऊन पळून गेले. याप्रकरणी तहसीलदार चित्रक यांच्या फिर्यादीवरून टिप्पर मालक भाऊसाहेब खांडेकर आणि चालक अमोल या दोघांवर पाटोदा पोलिसांत कलम ३७९, ३४१, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :BeedबीडsandवाळूMarathwadaमराठवाडा