रस्त्याची डागडुजी सुरू
बीड : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक व प्रवासी वैतागून गेले होते. दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली असून रस्ता दुरुस्तीने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.
नो पार्किंगचा बोजबारा
धारूर : धारूर बसस्थानकासमोर ड्यूटीवर पोलीसच नसल्याने नो पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. सर्रास रस्त्याच्या दुतर्फा चार चाकी व दुचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे रहदारीस अडथळा होतो व नागरिक व पादचारी यांना त्रास सहन करावा लागतो.
खड्ड्यांचा त्रास
बीड : येथील स्थलांतरित जिल्हा रुग्णालयाकडे जाणारा तेलगाव नाका ते नाळवंडी नाकादरम्यानचा रस्ता उखडला असून, रुग्णांसह नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालिका अथवा बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता. मात्र, बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.