शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बस पेटली, पळा...पळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:00 IST

नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले.

ठळक मुद्देचालक, क्लिनरचे प्रसंगावधान : चढ-उतारावर वारंवार ब्रेकमुळे लायनर होते गरम

नितीन कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककडा : नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले. बस पेटली पळा... पळा... ओरडत प्रवासी बसबाहेर सुखरुप पडले. तर वारंवार ब्रेक मारावे लागल्याने लायनर गरम होऊन बसने पेट घेतल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. महिनाभरात अशा प्रकारचा तालुक्यातील हा दुसरा अपघात आहे.नांदेड येथील शर्मा ट्रॅव्हल्सची बस गुरु वारी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी ३४ प्रवासी घेऊन निघाली होती. रात्री अकरा वाजता परळी येथे चहा नाष्टा करून पुढे डोंगरिकन्ही येथे काही वेळ थांबुन परत चहा पाणी करून ही बस पुण्याकडे निघाली. आष्टी तालुक्यातील बीड धामणगाव नगर रोडवरील सांगवी पाटण येथे शुक्र वारी पहाटे दोनच्या सुमारास बसने अचानक पेट घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. अशा परिस्थितीत चालकाने प्रसंगवधान राखले, त्यामुळे सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर पडले.ही घटना घडताच जवळच गव्हाच्या शेताला पाणी देणारे समीर शेख यांनी तिकडे धाव घेत मित्रांना फोन करून कळविले. आग विझवण्यासाठी धनंजय भोसले, माऊली खिलारे , राजु भोसले, उध्दव खिलारे , सद्दाम शेख व परिसरातील लोकांनी प्रयत्न केले. या दुर्घटनेत प्रवाशांचे सोने, भ्रमणध्वनी, पिशव्या, सुटकेस असे तीन लाखाच्या घरात नुकसान झाले आहे. सोने मोबाईल, बॅग मधील साहित्य असे एकुण तीन लाखांच्या घरात नुकसान झाल्याचे बोलले जात होते.याच रस्त्यावर महिन्यात दुसरी घटनावीस दिवसा पुर्वी बीड धामणगाव- नगर रोडवर कापशी येथे नगर येथून चिंचपूरकडे जाणारा एका ट्रक अचानक आग लागून जळून खाक झाला होता. याच रोडवर शुक्रवारी पहाटे ही दुसरी घटना घडली. दोन्ही घटनेत जिवीत हानी घडली नसून वाहने मात्र पुर्णपणे जळाली आहेत. चढ उताराचा हा रस्ता असल्याने कमी जास्त प्रमाणात ब्रेक मारावे लागते. सारखे सारखे ब्रेक दाबावे लागत असल्याने लायनरवर दाब येतो. आणि याच दाबामुळे ते गरम झाल्याने अचानक आग लागून पेट घेऊन गाडी पुर्णपणे जळाली.गॅस संपल्याने आग आटोक्यात आणता आली नाहीलक्झरी बसमध्ये आगीच्या घटना घडल्या तर अग्निशमन यंत्राची व्यवस्था असते. पण चालक याची खात्री करत नाहीत.एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग लागल्यानंतर ती विझवायला यंत्र हातात घेताच रिकामे असल्याने ती आग आटोक्यात येऊ शकली नाही.पाणी टाकूनही गाडी पुर्णपणे जळाली असल्याचे चालक अशोक बोराडे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडBus Driverबसचालकfireआग