शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील

By सोमनाथ खताळ | Updated: February 26, 2024 12:24 IST

मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच आवाहन केल्यानंतरही अंबड तालुक्यातील तिर्थपुरी येथे काही जणांनी बस पेटविली. तसेच जरांगे यांच्या सहकाऱ्यांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बीड/छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बस पेटविल्यानंतर बीड जिल्हाही सतर्क झाला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील इंटरनेट  सेवा १० तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. तसेच बीड व जालना जिल्ह्याची बॉर्डरही सील करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलाकडून आता कठोर पाऊले उचलली जात असून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरात बस, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

३० ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर बीड पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काही दिवस प्रकरण शांत झाल्यानंतर रविवारपासून मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच आवाहन केल्यानंतरही अंबड तालुक्यातील तिर्थपुरी येथे काही जणांनी बस पेटविली. तसेच जरांगे यांच्या सहकाऱ्यांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे समाज आक्रमक झाला असून पुन्हा एकदा दगडफेक, जाळपोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धागा पकडून बीड जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर आज सकाळीच सील करण्यात आली आहे. शिवाय २८ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पुढील काही तासांत १०० टक्के इंटरनेट बंद केले जाणार आहे. नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन प्रशासन व पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

बस, इंटरनेट सेवा बंद बीड, जालना , छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बससेवा बंद करण्यात आली आहे. तसेच अफवा पसरू नये म्हणून तिन्ही जिल्ह्यातील इंटरनेट सेवा देखील बंद पुढील दहा तास बंद करण्यात आली आहे.

वातावरण शांत राहिले तर सेवा सुरू होणारबीड व जालना जिल्ह्याची बॉर्डर सील करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात २८ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. सोबतच इंटरनेट सेवाही बंद करण्यासाठी पत्र दिलेले आहे. हळुहळू सर्व इंटरनेट बंद होईल. आज रात्रीपर्यंत तरी ही सेवा बंद राहिल. वातावरण शांत राहिले तर सेवा सुरू केली जाईल आणि काही अनुचित प्रकार घडला तर त्यात आणखी वाढ केली जाईल.- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBeedबीड