शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रूग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपयांची इमारत धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:33 IST

बीड : जिल्हा रुग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेली दोन मजली इमारत मागील दीड वर्षांपासून धूळ खात पडून आहे. किरकोळ कामे पूर्ण करुन जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात देण्यास बांधकाम विभागाची उदासीनता असल्याचे समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून या संदर्भात पत्रव्यवहारही झाला. परंतु बांधकाम विभागाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले.३२० खाटांचे जिल्हा ...

बीड : जिल्हा रुग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेली दोन मजली इमारत मागील दीड वर्षांपासून धूळ खात पडून आहे. किरकोळ कामे पूर्ण करुन जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात देण्यास बांधकाम विभागाची उदासीनता असल्याचे समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून या संदर्भात पत्रव्यवहारही झाला. परंतु बांधकाम विभागाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले.

३२० खाटांचे जिल्हा रुग्णालय आहे. परंतु अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) स्वतंत्र जागा नाही. तळमजल्यातच एसी उपलब्ध करुन आयसीयू कक्ष बनविण्यात आला. त्यामुळे उपचार करण्यासह घेणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत असे. तसेच जागाही अपुरी पडत होती. हाच धागा पकडून रुग्णालयाच्या बाजूलाच सव्वा कोटी रुपये खर्चून दोन मजली इमारत उभारण्यात आली. दीड वर्षांपूर्वी तिचे कामही पूर्ण झाले.

वीज, फरशी अशी किरकोळ कामे बाकी राहिल्याने ती अद्यापही रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात दिलेली नाही. ही कामे पूर्ण करुन इमारत ताब्यात द्यावी या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु बांधकाम विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही ही इमारत धूळ खात आहे. बांधकाम विभागाबद्दल सध्या तीव्र संताप व्यक्त होत आहे.काम निकृष्ट झाल्याची चर्चाइमारतीचे काम निकृष्ट झाल्याचे सूत्रांकडून समजते. खोल्यांमधील टाईल्स फरशी गळून पडली आहे. याबाबत दुरुस्ती करण्यास सांगितले असता बांधकाम विभागाने या फरशीला सिमेंट लावून न चिटकवता खिळे मारल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यावरुन बांधकाम विभागाचा कारभार कसा चालतो हे स्पष्ट होते. या निकृष्ट कामाची चर्चाही जोरात सुरु आहे. बांधकाम विभागाचे अभियंता नाईकवाडे यांच्याशी वारंवार संपर्क केला. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने बाजू समजली नाही.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडMarathwadaमराठवाडा