शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

‘बीएसएनएल’सेवा कागदावरच; ग्राहकांमध्ये रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 01:03 IST

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात बीएसएनएलकडून इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. मात्र, वर्ष उलटूनही याबाबत कसलीच सेवा मिळत नसल्याचे समोर आले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील सर्वच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात बीएसएनएलकडून इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. याचा मोबदलाही भरलेला आहे. मात्र, वर्ष उलटूनही याबाबत कसलीच सेवा मिळत नसल्याचे समोर आले आहे. ५० पैकी ३५ ठिकाणी अद्यापही सेवा मिळालेली नसल्याने यंत्रणा ‘आजारी’ पडली आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून पत्रव्यवहार केला असला तरी अधिकारी अनभिज्ञच आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र रोष आहे.जिल्ह्यात ११ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये आणि ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रात बीएसएनएलकडून इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. यासाठी १९ हजार १९९ रूपये शुल्कही भरले होते. वर्ष उलटूनही अद्याप काही आरोग्य केंद्रात ही सेवा सुरू झालेली नाही. याबाबत सप्टेंबर महिन्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी पत्र पाठवून सर्व माहिती दिली होती.यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आठवड्यात प्रश्न मार्गी लावण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, तीन महिने उलटूनही अद्याप ३५ ठिकाणची सेवा बंदच आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग वैतागला असून ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये धाव घेण्याच्या तयारीत आहे. याला संबंधित अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.बीएसएनएलच्या या गलथान सेवेमुळे ग्राहक खाजगी कंपन्यांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ग्राहकांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे.तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये - धारूर, पाटोदा , शिरूर, वडवणी, प्राथमिक आरोग्य केंद्रे - आपेगाव, बर्दापूर, भावठाणा, उजणी, धामणगााव, कुंठेफळ, सुलेमान देवळा, टाकळसिंग, नाळवंडी, साक्षाळपिंपरी, ताडसोन्ना, येळंबघाट, चकलांबा, जातेगाव, निपाणी जवळका, तलवाडा, आडस, चिंचोली माळी, गंगामसला, किट्टी आडगाव, सादोळा, धर्मापूरी, मोहा, नागापूर, पोहनेर, अंमळनेर, डोंगरकिन्ही, नायगाव, वाहली, खालापुरी, शिरूर येथील इंटरनेट सेवा बंद असल्याचे आरोग्य विभागाकडून लेखी स्वरूपात सांगण्यात आले.‘लोकमत’च्या वृत्तानंतर यंत्रणेला जागसप्टेंबर महिन्यात पैसे भरूनही इंटरनेट सेवा बंद असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणले होते. यावर बीएसएनएलचे अधिकारी खडबडून जागे झाले होते. यंत्रणा कामाला लावली होती. आठवडाभर सेवा सुरळीत मिळाली. आता मागील दोन महिन्यांपासून पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. यावरून अधिका-यांकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार केला जात असल्याचे उघड झाले आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर वरिष्ठांनी बीडच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले होते.

टॅग्स :BSNLबीएसएनएलHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल