शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रुग्णालयात पोलिसांसमोरच नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:04 IST

जिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केली.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन । रुग्णालयाला आले छावणीचे स्वरुप

बीड : जिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.शेख आमेर शेख जाफर (वय ३०, रा. राजीवनगर, बीड) असे मयताचे नाव आहे. शनिवारी रात्री ७ वाजता अपघात झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमकपणा घेत कर्तव्यावर असलेल्या रतन बडे या ब्रदरला मारहाण केली. टेबल फेकून देत कागदपत्रेही फाडली. ही घटना समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी रुग्णालय गाठले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. उप अधीक्षक भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे हे फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात तणाव होता.दरम्यान, मारहाणीची घटना घडल्यानंतर सर्व परिचारिका व कर्मचारी, डॉक्टर एकत्रित आले. त्यांनी घटनेचा निषेध नोंदवित कामबंद आंदोलन पुकारत कडक कारवाईची मागणी केली. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. बाबासाहेब ढाकणे, परिचारिका संगीता दिंडकर, शीला मुंडे, संगीता सिरसाट, स्वाती माळी, संगीता क्षीरसागर यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, सेवक यांची मोठी उपस्थिती होती.काय आहे नातेवाईकांचा आरोप ?आमेर शेख यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा ते जिवंत होते. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. त्यानंतर काही वेळांनी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर आणि कर्मचाºयांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत त्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात गोंधळ कायम होता.कडेकोट बंदोबस्तमारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला होता. त्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे रुग्णालयाला छावणीचे स्वरुप होते. रात्री उशिरापर्यंत हा तणाव कायम होता.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडPoliceपोलिस