शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये भाऊ ठरला बहिणीला भारी; धनंजय यांचा पंकजांना दुसरा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 05:01 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना दीड महिन्यात परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा दुसरा धक्का दिला.

सतीश जोशीबीड : राज्यातील सत्ता परिवर्तनाचा फटका बीड जिल्ह्यातील राजकारणास बसला. महाआघाडीच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी आपली बहीण पंकजा मुंडे यांना दीड महिन्यात परळी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा दुसरा धक्का दिला.जि.प.च्या पहिल्या टर्ममध्ये जशी मोडतोड करून पंकजा मुंडे यांनी भाजपला सत्तेत आणले होते, अगदी त्याच स्टाईलने यावेळेस भाजपला सुरुंग लावून तीन सदस्य फोडत धनंजय मुंडे यांनी जशास तसे उत्तर दिले. काँग्रेसचा एक सदस्य भाजपने फोडला परंतु, महाआघाडीस त्याचा काही फरक पडला नाही. मागील दोन वर्षांत जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अपयश आल्यानंतर धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले होते. २०१९ ची परळी विधानसभा निवडणूक अस्तित्वाची समजून लढले आणि पंकजा मुंडेंचा पराभव करीत २०१४ च्या पराभवाची परतफेड केली.राज्यातील सत्ता बदलात धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री झाले. अवघ्या दीड महिन्यांतच त्यांनी बीड जिल्हा परिषद ताब्यात घेऊन बहिणीला दुसरा धक्का दिला. ६० सदस्यांच्या सभागृहात पाच सदस्य अपात्र, तर बाळासाहेब आजबे आणि संदीप क्षीरसागर आमदार झाल्यामुळे त्यांच्या दोन जागा रिक्त झाल्या. त्यामुळे ५३ सदस्यांच्या या सभागृहात बहुमतासाठी २७ सदस्यांची आवश्यकता होती. राज्याप्रमाणेच या जिल्हा परिषदेतही महाआघाडीचा पॅटर्न राबवत शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळवली. पहिल्या टर्ममध्ये राज्यात भाजपची सत्ता होती. तेव्हा ग्रामविकासमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी तोडफोड करीत अशक्य असलेली जि.प.ची सत्ता हस्तगत केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य भाजपने फोडले होते. त्यापैकी पाच सदस्यांना अपात्र घोषित करीत मतदानापासून वंचित ठेवले आहे. पंकजा मुंडे यांचा हा पॅटर्न धनंजय मुंडे यांनी राबविला. भाजपचे तीन सदस्य फोडून मागचे उट्टे काढले.>भाजपच्या यंत्रणेत समन्वयाचा अभावमागच्या वेळी भाजपसोबत असलेल्या शिवसेनेच्या ४ आणि काँग्रेसच्या एका सदस्याला सोबत घेऊन भाजपला धोबीपछाड दिली. परळी विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे अजूनही सावरलेल्या नाहीत. मध्यंतरी गोपीनाथगडावर घेतलेल्या समर्थकांच्या मेळाव्यातच त्यांनी आपण जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय राहणार नसून ही जबाबदारी यापुढे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर सोपवित आहे, असे सांगून त्या जिल्ह्यातील राजकारणापासून अलिप्त राहिल्या होत्या.मागच्या वेळी त्यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी जोराचा प्रयत्न केला होता. तसे प्रयत्न यावेळी दोघीही बहिणींकडून झाल्याचे दिसले नाहीत. पंकजा मुंडे तर परदेशात होत्या. त्यामुळे भाजपच्या यंत्रणेत समन्वयाचा अभाव जाणवला. याउलट, सत्तेत आलेल्या धनंजय मुंडे यांनी अतिशय मुत्सद्दीगिरीने सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमविलेच नाही तर ही लढाई एकतर्फी जिंकली.