शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रदरला मारहाण; अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:09 IST

जिल्हा रूग्णालयात अपघात विभागातील डॉक्टर हजर नाहीत, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता घडली होती.

बीड : जिल्हा रूग्णालयात अपघात विभागातील डॉक्टर हजर नाहीत, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता घडली होती. उपचारानंतर जखमी ब्रदरने बीड शहर ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी चार लोकांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.रतन श्रिधर बडे असे मारहाण झालेल्या ब्रदरचे नाव आहे. ९ नोव्हेंबर रोजी शेख आमेर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी आक्रमक होत डॉक्टर कोणीच कसे नाहीत, कोठे गेले डॉक्टर असे म्हणत बडे यांच्यासमोरील टेबल उचलून फेकला. तसेच कागपत्रेही फाडून फेकले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अरिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी रूग्णालयात धाव घेऊन तणाव शांत केला होता.दरम्यान, बडे यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी सुट्टी होताच त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी तीन ते चार लोकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. तपास सपोनि सुरेश खाडे हे करीत आहेत.सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यातजिल्हा रूग्णालयातील मारहाण प्रकरण कॅमेºयात कैद झाले होते. याचे सर्व फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.याची चाचपणी करून आणि ओळख पटवून त्यांना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडCrime Newsगुन्हेगारी