कडा : आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी परिसरात सुरू असलेल्या कंपनीचे काम बंद करा, असे म्हणत गावातीलच सहाजणांनी दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यावेळी कंपनीतील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथे रेणू सूर्या अलोक या कंपनीच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता गावातीलच आजिनाथ वायभासे, गणेश वायभासे, सुभाष वायभासे, बाळासाहेब वायभासे, भीमाबाई वायभासे, लताबाई वायभासे यांनी सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद करा, असे म्हणत येथील दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यावेळी त्यांनी कंपनीच्या साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. याबाबतची फिर्याद संतोष शांताराम चव्हाण (रा. निर्मलनगर, अहमदनगर) यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करीत आहेत.