शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या वडिलांना अटक, पोलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:01 IST

बुधवारी एका १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मित्राच्या मदतीने अपहण करुन अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मदत करणारे मुलाचे मित्र त्याचे वडील व त्यांचे मित्र यांच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअत्याचार प्रकरण। पिता-पुत्रावर पाक्सोनुसार गुन्हा; स्था. गुन्हे शाखेकडे तपास

बीड : बुधवारी एका १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मित्राच्या मदतीने अपहण करुन अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मदत करणारे मुलाचे मित्र त्याचे वडील व त्यांचे मित्र यांच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडीलांना अटक केली असून न्यायालयाने ११ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.या प्रकरणाची तक्रार दडपण्याचा प्रकार करणारे शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सत्यवान गर्जे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी दिरंगाई का झाली, अशा संवेदनशिल विषयात शहर ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष का घातले नाही, यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक पोद्दार म्हणाले. तसेच या प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. याबाबत वैद्यकीय तपासणीच्या आधारे वय निश्चित केले जाणार आहे. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून यासंदर्भातील कायद्यातील सुधारणांचा आधार घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे देखील असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोनि भारत राऊत व त्यांचे सहकारी करत आहेत.सामाजिक संघटनांचे जिल्हाधिकाºयांना निवेदनअल्पवयीन मुलीवर अपहरण करुन अत्याचार ही घटना काळीमा फासणारी आहे. यासंदर्भात शहरातील विविध संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला जात आहे. यासंदर्भात आरोपीला मदत करणाºयांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अशोक हिंगे, बी.बी.जाधव, अशोक सुखवसे, अ‍ॅड गणेश पोकळे, कुंदा काळे यांच्यासह इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारArrestअटकCrime Newsगुन्हेगारी