शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये खरीप हंगामापूर्वी मिळणार बोंडअळीचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:32 IST

बीड जिल्ह्यात यंदा दुष्काळ नसताना देखील शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे देशोधडीला लागला आहे. हे अनुदान खरीप हंगामापूर्वी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रभात बुडूख।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात यंदा दुष्काळ नसताना देखील शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे देशोधडीला लागला आहे. हे अनुदान खरीप हंगामापूर्वी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनदरबारी वेळोवेळी मागणी, आंदोलने करून बोंडळीचे सरसगट अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. शासनाने खरिपापूर्वी हे अनुदान द्यावे अशी शेतकºयांची मागणी होती. राज्य शासनाने बोंडअळीचे सरसकट अनुदान खरिपापूर्वी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले दिले आहेत. मात्र, हे अनुदानाचे पैसे तीन टप्प्यात मिळणार असल्याने पुन्हा एकदा शासनाने कोंडीत पकडल्याची भावना शेतकºयांची आहे. हे अनुदान तीन टप्प्यात वाटप न करता सर्व तालुक्यांना एकाच वेळी दिले तर, शेतक-यांना खरिपाच्या लागवडीसाठी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा आहे. राज्यात ४३ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. त्यात बीड जिल्ह्यातील क्षेत्र जवळपास ३ लाख ७८ हजार हेक्टर होते. जिल्ह्यात मुख्य पीक हे कापूस असल्यामुळे शेतक-यांचे संपूर्ण अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. मात्र कापूस वेचणीवेळी बोंडअळीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती.

पिकावर बोंडअळी पडल्यामुळे नुकसान झाले. वेळोवेळी बोंडअळी प्रादुर्भाव मदत अनुदान तात्काळ मिळण्यासाठी जिल्हाभर आंदोलने झाली. शेतक-यांचा रोष लक्षात घेऊन शासनाने खरिपापूर्वी बोंडअळी अनुदान देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार बीड जिल्ह्यासाठी २५६ कोटी ५८ लाख रूपये बोंडअळी अनुदान तीन टप्प्यात वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील रक्कम शासन लवकरच जिल्हा प्रशासनाकडे अदा करणार आहे. या टप्प्यातील रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर, त्यांची यादी राज्य शासनाला पाठवायची आहे व दुसºया टप्प्यातील रकमेची मागणी करायची आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेले बोंडअळी प्रादुर्भाव अनुदान खरिपापुर्वी मिळेल का हा प्रश्न मात्र कायम आहे.बँकांना इशाराबोंडअळी प्रादुर्भाव अनुदान शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे बँक हे पैसे कपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे अनुदानाचे पैसे कपात न करण्याचे निर्देश राज्य शासनाने बँकाना दिले आहे.जिल्ह्यात एकूण कापूस उत्पादक शेतकरी संख्या ६ लाख ९२ हजार ३८ एवढी आहे. कापूस नुकसान झालेल्या शेतकºयांना जिरायतीसाठी ६८०० रुपये तर बागायतीसाठी आठ हजार अनुदान जाहीर झाले होते. मात्र, हे अनुदान कधी मिळणार यासंबंधी शेतकरी संभ्रमित होता. मात्र खरिपापूर्वी हे अनुदान बँक खात्यावर येणार असल्याने खरिप लागवडीसाठी या पैशांची शेतक-यांना मदत होणार आहे.

पीकविमाही तात्काळ द्यागतवर्षी पिकांच्या नुकसानीपोटी पीकविम्याची रक्कम मिळाली होती. त्याच आशेने या वर्षी देखील शेतकºयांनी स्वत: खिशातील पैसे घालून पीकविमा भरला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हक्काचे पीकविम्याचे पैसे तात्काळ देण्याची मागणी होत आहे. हे पैसे देखील खरिप हंगाम सुरू होण्याआधी मिळाले तर शेतकºयांना याचा फायदा होणार आहे.निर्देशाची तत्परतेने अंमलबजावणीजिल्हा स्तरावर येणारी पहिल्या टप्प्यातील रक्कम तात्काळ शेतकºयांपर्यंत पोहचवली जाईल. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. वेळोवेळी पाठपुरावा पुढील टप्प्यातील रक्कम देखील तात्काळ अदा केली जाईल. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकºयांना बोंडअळी अनुदानाचा लाभ दिला जाईल. यासाठी जिल्हा प्रशासन राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाची तत्परतेने अंमलबजावणी करील.- चंद्रकांत सूर्यवंशीनिवासी उपजिल्हाधिकारी, बीड

टॅग्स :BeedबीडcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडा