शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांचा राजीनामा, संचालकाकडून तात्काळ मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 19:29 IST

राजीनामा राजकीय दबावपोटी की अडीच वर्षाची मुदत संपल्याने? उलट सुलट चर्चा सुरू

माजलगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी बुधवारी अचानक राजीनामा दिला. राजीनाम्यास वेळ न लावता पनन संचालकांनीही तो तात्काळ मंजूर केला. हा राजीनामा राजकीय दबावापोटी देण्यात आला की, अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने देण्यात आला याबाबत उलट उलट चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडीच वर्षापूर्वी अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय व माजलगाव येथील रहिवासी अशोक डक सभापती झाले होते. चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून वारंवार दबाव येत असल्याची चर्चा होती. दरम्यान माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने अशोक डक यांना राजीनामा द्यावा लागणार असे वाटत असताना अशोक डक यांनी कोर्टातून याला स्थगिती मिळवली होती. यानंतरही त्यांना राजकीय दबाव असल्याचे बोलले जात होते.अचानक बुधवारी सभापती अशोक डक यांनी पदाचा राजीनामा पणन संचालक पुणे यांच्याकडे दिला. त्यानूसार संचालकांनी तात्काळ तो मंजुर करत मुंबई बाजार समितीस याबाबत कळविले आहे.

राजीनामा ठरल्या प्रमाणे …

मुंबई बाजार समितीमध्ये आमची सत्ता आली तेव्हा अडीच वर्षेच हे पद आपल्याकडे होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडे पद घेण्यापूर्वीच आपण राजीनामा लिहून दिला होता. आपली अडीच वर्षाची मुदत संपल्याने व ठरल्याप्रमाणे आपण राजीनामा दिला आहे. पुढील सभापती राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस किंवा शिवसेना ठाकरे गट यांचापैकी होईल.- अशोक डक

टॅग्स :Beedबीडmajalgaon-acमाजलगांव