शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र; बीडमध्ये ५२ शिक्षक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 20:06 IST

जिल्हा परिषद सीईओंची कारवाई : स्वत:सह नातेवाइकांना दाखविले होते दिव्यांग

बीड : बदलीसाठी सोयीचे ठिकाण मिळावे, यासाठी शिक्षकांनी स्वत:सह नातेवाइकांना दिव्यांग दाखविण्याचा प्रताप केला होता. याबाबत तक्रारी प्राप्त होताच सुनावणी घेऊन पुनर्तपासणी करण्यात आली. यात ५२ शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी याबाबत आदेश काढले आहेत. या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषदेतील २०२२ अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे बदली करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. ७ एप्रिल २०२१ मधील शासन निर्णयानुसार दिव्यांग, आजारी असणाऱ्यांसाठी विशेष तरतूद आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील शिक्षकांनी स्वत:सह नातेवाइकांना आजारी, दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र काढले. याबाबत संशय आला, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनीही तक्रारी केल्या. याच अनुषंगाने जिल्ह्यातील ३३६ शिक्षकांची सुनावणी ठेवण्यात आली. यातील २३६ शिक्षकांची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयामध्ये पुनर्तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ५२ शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले. या सर्वांची पुन्हा एकदा सुनावणी ठेवली, परंतु त्यात त्यांना समाधानकारक खुलासा मांडता आला नाही. त्यामुळे या सर्व ५२ शिक्षकांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच या सर्वांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. यातही दोष सिद्ध झाल्यास या शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘लोकमत’ने केला पाठपुरावाया बोगस प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने ‘लेाकमत’ने सुरुवातीपासूनच आवाज उठविला आहे. तसेच जिल्हा परिषदेतील कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फतची तपासणी, स्वाराती रुग्णालयातील पुनर्तपासणी, पुन्हा सीईओंसमोरची सुनावणी या सर्वांचा आढावा घेत त्याचा पाठपुरावा केला होता. याचीच दखल घेत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रमाणपत्रांमध्ये डोळे, कान, आणि अस्थिव्यंगाचे अधिक रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडTeacherशिक्षक