शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता तरूणाचा मृतदेह माजलगाव धरणात सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:28 IST

बाहेर जाऊन येतो म्हणून घराबाहेर गेलेल्या तरूणाचा मृतदेह माजलगाव धरणात मंगळवारी सकाळी आढळून आला.

ठळक मुद्देघातपात की आत्महत्या ? : पालकांनी केली होती हरवल्याची तक्रार

माजलगाव : बाहेर जाऊन येतो म्हणून घराबाहेर गेलेल्या तरूणाचा मृतदेह माजलगाव धरणात मंगळवारी सकाळी आढळून आला. या तरूणाच्या पालकाने रविवारी रात्री शहर पोलिसात हरवल्याची तक्र ारही दाखल केली होती. मंगळवारी अचानक मृतदेह आढळल्याने ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.चंद्रकांत बाजीराव राठोड (वय २४, रा.गजानन नगर) हा डी.फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणारा विद्यार्थी २४ मार्च रोजी सकाळी १० वाजता मी बाहेर जाऊन येतो, असे म्हणून बाहेर गेला. परंतु तो घरी आला नाही. त्यामुळे दिवसभर व रात्री वाट पाहून नातेवाईकांनी त्याला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा संपर्क होत नसल्याने रविवारी रात्री तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात त्याचे वडील बाजीराव चारू राठोड (शिक्षक) यांनी केली होती.त्याच बेपत्ता तरुणाचा माजलगाव धरणात बुडालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी सकाळी फोनवरून मिळाली.घटनास्थळी पोलिसांना सदरील तरु णाचे कपडे धरण काठावरील दगडावर मिळून आले. त्यामुळे संबंधित तरु णाचा पोहताना बुडून मृत्यू झाला, की त्याने आत्महत्या केली, की त्याचा घातपात झाला, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार तरूणाच्या शरीरावर ओरबाडण्याच्या तसेच मुका मार दिल्याचा खुणा दिसत आहेत. त्यामुळे हा घातपात आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतरच खरा प्रकार स्पष्ट होईल, असे सांगितले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीतआहेत.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणDeathमृत्यू