शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

खून, दरोड्याचा तपास ढिम्म !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:21 IST

गेवराई शहरातील खडकपुरा भागात पुष्पा शर्मा या वृद्धेची हत्या करून दरोडेखोरांनी सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अद्यापही यामध्ये कसलाच ‘क्ल्यू’ मिळालेला नाही.

ठळक मुद्देपाच दिवस उलटले : गेवराई ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली

बीड : गेवराई शहरातील खडकपुरा भागात पुष्पा शर्मा या वृद्धेची हत्या करून दरोडेखोरांनी सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अद्यापही यामध्ये कसलाच ‘क्ल्यू’ मिळालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यातच गेवराई पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.मागील काही दिवसांपासून गेवराई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. वारंवारचे घडणारे गंभीर गुन्हे आणि त्यातच घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यातच सोमवारी पहाटेच्या सुमारास खडकपुरा भागात पुष्पा शर्मा या वृद्ध महिलेचा खून करून दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेला पाच दिवस उलटूनही अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. या गंभीर प्रकरणाचा तपास अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.त्यातच गुरूवारी सायंकाळी नागझरीमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. एकावर तलवारीने सपासप वार करून दिवसाढवळ्या हत्या केली. तर दुसरा गंभीर जखमी झाला. या दोन घटना अवघ्या आठवड्यात घडल्याने गेवराई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या गुन्ह्यांचा तात्काळ तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहेचार आरोपी मोकाटच : पोलिसांची चार पथके आहेत कोठे ?नागझरी खून प्रकरणात तीन आरोपीला अटक केली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येतील आणखी चार आरोपी मोकाटच आहेत. याचा तपास गेवराई पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.शर्मा खून आणि त्यांच्या घरी पडलेल्या दरोड्याच्या तपासासाठी चार पथके नियूक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. पाच दिवस उलटूनही या पथकांना मुख्य आरोपींपर्यंत तर दुरच साधा ‘क्ल्यू’ सुद्धा काढता आलेला नाही. त्यामुळे हे चार पथके आहेत तरी कोठे आणि करतात काय? असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक आणि गेवराई पोलीस याचा तपास करीत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या हाती यश आलेले नाही.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी