शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

पित्याचा तलवारीने खून; मुलास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:21 IST

शेतातून जाणाऱ्या वाटेवरून निर्माण झालेल्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा तलवारीने हल्ला करून खून केला होता. यात आरोपी मुलाला जन्मेठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील घटना : बीड येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बीड : शेतातून जाणाऱ्या वाटेवरून निर्माण झालेल्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा तलवारीने हल्ला करून खून केला होता. यात आरोपी मुलाला जन्मेठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल बुधवारी तिसरे अति.जिल्हा व सत्र न्या. यू.टी.पोळ यांनी दिला.काकासाहेब किसन कर्डीले असे मयत पित्याचे नाव असून संपत कर्डीले असे शिक्षा लागलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. २ जून २०१७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास संपतने रस्ता करण्यासाठी शेतात जेसीबी आणली. यावरूनच संपत आणि पिता काकासाहेब यांच्यात वाद झाला. हाच राग मनात धरून रात्री ११ वाजेच्या सुमारास संपतने काकासाहेब यांच्यावर पायावर, हातावर तलवारीने वार करून खून केला. याप्रकरणी मयताचा भाऊ दत्तात्रय कर्डीले यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आष्टीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. याची सुनावणी तिसरे जिल्हा व सत्र न्या. यू.टी.पोळ यांच्या न्यायालयात झाली.या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अंमलदार यांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील अनिल भ.तिडके यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी संपतला कलम ३०२ प्रमाणे दोषी ठरवून जन्मठेप व १ हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षे सक्त मजूरीची शिक्षा ठोठावली. तसेच कलम २०१ प्रमाणे दोषी ठरवून दोन वर्षे सक्त मजूरी व ५०० रूपयांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा.सरकारी वकील अनिल. भ. तिडके यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी म्हणून सहा.फौजदार ठाकूर व पोलीस हवालदार बाळासाहेब सानप यांनी या प्रकरणात मदत केली.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCourtन्यायालयOrder orderआदेश केणे