पुण्यतिथीदिनी भक्ती अन् नाट्यसंगीत
बीड : गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रकाश मानूरकर यांच्या निवासस्थानी भक्ती आणि नाट्यसंगीत मैफिलीचे आयोजन केले होते. भरत लोळगे, सतीश सुलाखे, शरद देशपांडे, अरविंद मुळे आणि महेश वाघमारे यांनी प्रारंभी पंचपदी सादर करून नंतर विविध अभंग, भक्तीगीते, नाट्यगीते सादर केली. या गायनास प्रकाश मानूरकर आणि नरहरी दळे यांनी तबला संगत तर सुदर्शन धुतेकर यांनी हार्मेानियम संगत केली. एकाहून एक गीते यावेळी सादर करण्यात आली.
खंडित वीजपुरवठ्याने ग्राहक त्रस्त
धारूर : महावितरणच्या दुर्लक्षामुळे विद्युत ग्राहक त्रस्त झाले आहेत. शहरातील पाटील गल्ली, कटघरपुरा, डोंगरवेस भागातील विद्युतपुरवठा नेहमी खंडित होतो. मध्यरात्रीनंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर सकाळी ९ वाजेपर्यंत सुरळीत होत नाही. असे प्रकार नेहमीच होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खंडित वीज पुरवठ्याने महावितरणचा संपर्क क्रमांक बंद असतो, त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी? असा प्रश्न निर्माण होत आहे.