शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजोळी आलेल्या चिमुरड्यांवर काळाचा घाला; हिटरचे उकळते पाणी अंगावर पडून तीन बालिकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:57 IST

हिटर कलंडल्याने उकळते पाणी अंगावर पडून उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मामाच्या गावी आलेल्या दोन मुलींसह त्यांच्या मामाच्या मुलीचा होरपळून अंत झाला.

ठळक मुद्देदोन दिवसापासून गेलेली वीज मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आल्याने नजरचुकीने चालू राहिलेल्या हिटरमधील पाणी उकळून बाहेर आले.

अंबाजोगाई : दोन दिवसापासून गेलेली वीज मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आल्याने नजरचुकीने चालू राहिलेल्या हिटरमधील पाणी उकळून बाहेर आले. त्यामुळे हिटर कलंडल्याने उकळते पाणी अंगावर पडून उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मामाच्या गावी आलेल्या दोन मुलींसह त्यांच्या मामाच्या मुलीचा होरपळून अंत झाला. ही हृदयद्रावक घटना अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत मामीदेखील गंभीर भाजली असून, त्यांच्यावर लातूर येथे उपचार सुरु आहेत.

दुर्गा बिभीषण घुगे (वय १०, रा. सोनपेठ, जि. परभणी), धनश्री पिंटू केदार (वय ८, रा. व्हट्टी, ता. रेणापूर, जि. लातूर) आणि आदिती संभुदेव भताने (वय ४) अशी या बालिकांची नावे आहेत. दुर्गा आणि धनश्री या दोघी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी येथील त्यांचे मामा संभुदेव दत्तात्रय भताने यांच्याकडे आल्या होत्या. शुक्रवारी रात्री दुर्गा, धनश्री, आदिती आणि संभुदेव यांच्या पत्नी संगीता (वय २४) या घरात झोपल्या होत्या तर इतर कुटुंबीय बाहेर झोपले होते. गावात दोन दिवसांपासून वीज नसल्याने सकाळी सुरु केलेल्या पाण्याच्या हिटरचे बटन तसेच चालू अवस्थेत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वीज आली आणि हे हिटर सुरु झाले. त्यातील पाणी उकळून बाहेर आले.

हे पाणी पडून हिटर ठेवलेल्या स्टूलखालील सिमेंटचे गट्टू खचले आणि हिटर कलंडून उकळते पाणी जवळच गाढ झोपेत असणाऱ्या मुली आणि त्यांच्या मामींच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्या या घटनेत चौघीही गंभीररीत्या भाजल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून जागे झालेल्या कुटुंबियांनी त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान आदितीचा मृत्यू झाला. प्रकृती चिंताजनक झाल्याने दुर्गा, धनश्री आणि संगीता यांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना मंगळवारी दुर्गाचा आणि बुधवारी धनश्रीचा मृत्यू झाला. त्यांच्या मामी संगीता भताने यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आदिती, दुर्गा, आणि धनश्री यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या  घटनेमुळे संपूर्ण भतानवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटलFamilyपरिवार