सुर्यफूल हे पीक तर डोंगर परिसरात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मोठी पिवळे फुले दिसणारे सूर्यफूल हे पीक आहे. त्याचप्रकारे छोटी बारिक फुले असणारे, उंची कमीत कमी तीन फुटापर्यंत वाढणारे काळे कारळे पीक आहे. यापासून तेलही काढले जाते. ते तेल खाण्यासाठी एकदम उत्तम म्हणून वापरले जाते . नसता काळे कारळे कुटून भाजीला चटणीलाही वापरले जाते. हे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे . नवीन रब्बी पीक म्हणून शिवाजी घोळवे यांनी एक एकरवर या जुन्या पिकाची लागवड केली आहे . यातून त्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या हे पीक बहरात आले असून फुलांचा सुगंध दरवळत आहे. सोनेरी किटक परागकण गोळा करत आहेत. पक्षी घिरट्या मारत आहेत . त्यांना भीती दाखवण्यासाठी पिकामध्ये बुजगावणे करण्यात आले आहेत. मधमाशा मकरंद गोळा करण्यासाठी रुंजी घालत आहेत. असे एकंदरीत मन प्रसन्न करणारे वातावरण या पिकामध्ये दिसत आहे, असे शेतकरी अक्षय बाबासाहेब घोळवे यांनी सांगितले .
आंबेवडगाव परिसरात काळे कारळे पीक जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST