बीड : मराठा आरक्षणानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यात राज्यातील आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले. धनगर आरक्षणाबाबतीतही या सरकारची भूमिका स्पष्ट नाही. केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसींचे आरक्षण टिकू शकले नाही, अशी टीका भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली.
राजकीय आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते. बीडमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व ॲड. सर्जेराव तांदळे, माजी आमदार केशव आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली. यानंतर बीड बसस्थानकासमोर दोन तास प्रचंड घोषणाबाजी करीत हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
पोलिसांनी प्रमुख आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली. या आंदोलनात भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख, नवनाथ शिराळे, प्रा. देविदास नागरगोजे, राजेंद्र बांगर, जगदीश गुरखुदे, जयश्री मुंडे, विक्रांत हजारी, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, सलीम जहांगीर, चंद्रकांत फड, संतोष हंगे, भगीरथ बियाणी, शांतीनाथ डोरले, विलास बामणे, गणेश पुजारी, अनिल चांदणे, हरीश खाडे, भूषण पवार, किरण बांगर, दत्ता परळकर, सुनील मिसाळ, संग्राम बांगर, फारुख भाई, इर्शाद भाई, विठ्ठल ठोकळ, अमोल वडतिले, अजय ढाकणे, मीरा गांधले, शीतल राजपूत, संध्या राजपूत, संगीता धसे, छाया मिसाळ, अनिता जाधव, शाम राऊत, रवींद्र कळसाने, राकेश बिराजदार, दीपक थोरात, कपिल सौदा, अडू भाई, आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बीड पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तर आंदोलनकर्त्यांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत.
....
ओबीसी आरक्षण बचावासाठी विविध संघटनांचा पाठिंबा
भारतीय जनता पक्षने पुकारलेल्या ओबीसी आरक्षण आंदोलनाला जिल्ह्यातील बारा बलुतेदार संघटना, माळी महासंघ, धनगर उन्नतीसंघ, नाभिक समाज संघटना, गुरव समाज संघटना, वंजारी सेवासंघ, चर्मकार महासंघ, मागासवर्गीय पदोन्नती बचाव समिती, सकल ओबीसी संघटना, बागवान समाज संघटना, आतार समाज संघटना, महाडगी जोशी समाज संघटना या संघटनांनी पाठिंबा दिला. ओबीसी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते प्रा. लक्ष्मण गुंजाळ, प्रकाश कानगावकर, सरपंच पितळे, अशोक पांढरे, संजय गुरव, सुतार संघटनेचे बापूराव भालेकर यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग नोंदवून समर्थन दिले.
...
दोन तास प्रवासी खोळंबले
बीड बसस्थानकासमोर चक्का जाम असल्यामुळे मांजरसुंबा, लातूर, सोलापूरकडे जाणाऱ्या बस दोन तास बसस्थानकात थांबून होत्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. आंदोलन संपल्यानंतर या रोडवरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
===Photopath===
260621\26_2_bed_2_26062021_14.jpeg~260621\26_2_bed_3_26062021_14.jpg
===Caption===
बीड येथील बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलनातील सहभागी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते ~बसस्थानाकासमोर चक्काजाम असल्यामुळे स्थानकातील बस थांबून होत्या,प्रवशांचा खोळंबा झाला