शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"तो काय उद्योग करतो मला थोडी माहिती"; समर्थकाने केलेल्या मारहाणीवर सुरेश धसांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:44 IST

बीडमधल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरेश धस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Suresh Dhas: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून बीड जिल्हा चर्चेत आहे. अशातच आता बीडच्या शिरूर तालुक्यात एका तरुणाला बॅटने मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करणारी व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असून भाजप आमदार सुरेश यांचा समर्थक असल्याचे समोर आलं. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना टार्गेट करणाऱ्या सुरेश धस यांच्यावरच टीका केली जात आहे. यावर बोलताना जर मारहाण झालेल्या व्यक्तीने तक्रार दिली तर कारवाई करावी असं सुरेश धस यांनी म्हटलं.

बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात सतिश भोसले नावाच्या व्यक्तीने एका तरुणाला बॅटने जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सतीश भोसले भाजपा भटक्या विमुक्तचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. व्हिडीओमध्ये सतिश भोसले तरुणाला बॅटने अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतिश भोसले हा सुरेश धस यांचा समर्थक असल्याचे समोर आलं. सतिश भोसलेले सुरेश धस यांच्यासोबत असलेले फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. या प्रकरणावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना तो ओळखीचा असल्याचे सुरेश धस यांनी मान्य केलं.

"समोरच्या व्यक्तीन फिर्याद द्यावी. या घटनेचे मी समर्थन केलेले नाही. तो जर असं काही म्हटला असेल तर त्याची मी भेट घेईल. सतिश भोसलेला मी ओळखतो. तो कधीतरी माझ्याकडे येतो. पाठीमागे तो काय उद्योग करतो हे मला थोडी माहिती आहे. शंभर टक्के सतिश भोसलेवर कारवाई झाली पाहिजे. पीडित समोर आले तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मी पहिल्यापासून म्हणत आहे," असे सुरेश धस यांनी म्हटलं.

"कोण कुणाला बॉस म्हणतो याची माहिती आपण ठेवू शकत नाही. तो मला बॉस म्हणत असेल तर मीच म्हणतोय की त्याच्यावर योग्य कारवाई व्हायला हवी. ही घटना दीड वर्षापूर्वीची आहे हे मला माहिती आहे. हे प्रकरण बीडमधील नाही. खोटं सोनं दिल्याच्या कारणावरुन हा प्रकार घडला असल्याची माझी माहिती आहे," असंही सुरेश धस म्हणाले. 

टॅग्स :BeedबीडSuresh Dhasसुरेश धस