शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मोठी बातमी! राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळा; अध्यक्ष चंदूलाल बियाणी न्यायालयासमोर हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 15:39 IST

अध्यक्ष चंदूलाल बियाणीने अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली असून अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवून घेतल्या. नंतर त्या परत केल्या जात नसल्याने ठेवीदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याप्रमाणे अध्यक्ष चंदुलाल बियाणीसह संचालकांवर गुन्हे दाखल झाले होते. यात आतापर्यंत फरार असलेले बियाणी सोमवारी अंबाजोगाईत न्यायालयासमोर हजर झाले. त्यांना अंबाजोगाई पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले.

परळी येथे चंदुलाल बियाणी यांनी राजस्थानी मल्टीस्टेट उघडली. यात लोकांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी घेतल्या. परंतु, नंतर त्या परत करण्यास हे अपयशी ठरले. त्यामुळे कारवाईसाठी परळी तहसीलसमोर आगोदर सात दिवस साखळी उपोषण केले. परळी शहर ठाण्यासमोरही सात दिवस उपोषण केले. बीडमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर २४ मे रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लातूर, परळी, अंबाजोगाई, नांदेड, उदगीर, घाटनादूर, संभाजीनगर, नाशिक, बीड शहर अशा विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले. आजही हे सत्र सुरूच आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत चंदुलाल बियाणी यांचा मुलगा अभिषेक बियाणी याला अटक करण्यात आलेली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू होता. सोमवारी अध्यक्ष चंदुलाल बियाणी स्वत:हून अंबाजोगाई न्यायालयासमोर हजर झाले. त्यांना अंबाजोगाई शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले. आता त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मागितली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवी जमा केल्या मात्र, त्यानंतर बीड जिल्हयातील परळी येथील मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करत बियाणी यांनी पोबारा केला. कष्टाचा पैसा बुडण्याच्या स्थितीत आल्यानं ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळावर ठेवीदारांचे जवळपास ३०० कोटी रुपये बुडवल्या प्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड