शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

मोठी बातमी ! बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 08:38 IST

मनुष्यहानी टाळण्यासाठी त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारा

ठळक मुद्देमुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी दिले आदेशआ. बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश

-  अविनाश कदम आष्टी : तालुक्यातील वनपरिक्षेत्र आष्टी अंतर्गत सुरुडी , किन्ही , मंगरुळ , पारगाव जो . ता आष्टी जि . बीड व वनपरिक्षेत्र पाटोदा अंतर्गत मौजे जाटवड परिसरातील तसेच सोलापुर वनविभागातील मोहोळ वनपरिक्षेत्रातील मौजे लिंबेवाडी ता . करमाळा या परिसरात नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत आहे. यामुुळे मानवी जिवितास धोकादायक ठरलेल्या बिबटयाला पिंजराबंद करण्यास तसेच गरजेप्रमाणे तज्ञाचे उपस्थितीत बेशुध्द करून बंदीस्त करण्याची मंजुरी जेरबंद,बेशुद्ध करणे शक्य न झाल्यास ठार मारण्याची परवानगीचा आदेश मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्यवन संरक्षक महाराष्ट्र राज्याचे नितिन काकोडकर यांनी दिला आहे. याबाबत आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस यांनी पत्र व्यवहार केले होते.

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांनी जीव गमावला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी असून बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरिकांनी बिबट्यास ठार ककरण्याची मागणी केली होती. दिलेल्या आदेशात नमूद आहे की, बिबटयाला जेरबंद,बेशुध्द करणे शक्य न झाल्यास सदर बिबटयाला अधिक मनुष्य हानी टाळण्याच्या दृष्टीने ठार मारण्याची परवानगी देण्यात येत आहे . सदर कार्यवाही करण्यास मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) औरंगाबाद आणि मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) पुणे यांना व त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी / कर्मचारी / पोलीस अधिकारी / इतर व्यक्ती यांना अधिकृत करण्यात येत आहे . सदर आदेश दिनांक ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वैध राहिल . शक्यतो सर्व पर्यत्न करून बिबटयाला जेरबंद / बेशुध्द करण्यास प्राधान्य द्यावे . सदर बिबटयाला ठार मारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पारितोषक जाहिर करण्यात येऊ नये . आवश्यकतेनुसार Sniffer dog ची सहायता घेण्यात यावी . सदर बिबटयास जेरबंद / बेशुध्द आणि ते शक्य न झाल्यास त्याला ठार करण्याच्या कार्यवाहीला एकंदर नियोजनाकरिता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) पश्चिम , मुंबई हे समन्वय अधिकारी राहतील . सदर बिबट बंदीस्त झाल्यास त्याला मानवी संपर्कापासून दुर ठेवण्याची संपुर्ण दक्षता घेण्यात यावी . सदर बिबटयाची तज्ञ पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडून स्वास्थ्य तपासणी करून पर्यावरण व वन मंत्रालय , भारत सरकार यांचे मार्गदर्शक सुचनेत नमुद केल्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी . उपद्रव ग्रस्त क्षेत्रात पुन : श्च अनुचित घटना घडणार नाही , या करिता नियमित गस्त , कॅमेरे ट्रॅप्सद्वारे सनियंत्रण , बिबटच्या अस्तित्वदर्शक सर्व पुरावे गोळा करण्याची कामे तसेच स्थानिक ग्रामस्थांमध्ये मानव वन्यजीव संर्घष टाळण्यासाठी जनजागृती करणे व बिबटयाच्या हालचालीची माहिती तात्काळ प्राप्त करण्यास आवश्यक जाळे उभारणे याबाबत कार्यवाही योग्य कालावधी पर्यंत कार्यरत ठेवण्यात यावी असे दिलेल्या आदेशात नमूद आहे.

टॅग्स :leopardबिबट्याBeedबीडforestजंगल