शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बीडकरांचा नादच खुळा; दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये धावले ९० किलोमीटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:28 IST

जगभरातल्या सुमारे ७० देशांतील २३ हजार धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

बीड : दक्षिण आफ्रिका येथे जगातील अवघड व प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ स्पर्धा ८ जून रोजी झाली. यात बीडमधील डॉ. संजय जानवळे, डॉ. विश्वास गवते आणि हरी ठाेंबरे यांनी ही मॅरेथॉन यशस्वी पूर्ण करत ९० किमीचे अंतर जवळपास ११ तासांत पूर्ण केले. त्यांनी जिल्ह्यामध्ये एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. बीडकरांनी दक्षिण आफ्रिकेतही नाद खुळा नेत्रदीपक कामगिरी केल्याने स्वागत होत आहे.

जगभरातल्या सुमारे ७० देशांतील २३ हजार धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. पीटरमारीत्जबर्ग ते डर्बन असा चढ-उताराचा हा मार्ग पार करताना धावपटूंचा कस लागतो. या स्पर्धेत भारतातून सुमारे ४१२, तर बीड जिल्ह्यातून बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विश्वास गवते आणि हरी ठोंबरे हे तीन धावपटू सहभागी झाले होते. या तिघांनीही ही मॅराथॉन यशस्वी पार केली. ९० किलोमीटर अंतर पार करणारे या तिघांसह संतोष भोकरे एक आहेत. आगामी काळात धावपट्टूंची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, बीडमध्ये काही दिवस व सध्या पुण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले साईनाथ ठोंबरे यांनीही ९० किमीचे अंतर ११ तास २० मिनिटांत पार केले.

कोणाला किती वेळ लागला?डॉ. विश्वास गवते - १० तास ४६ मिनिटेहरी ठोंबरे - ११ तास १४ मिनिटेडॉ. संजय जानवळे - ११ तास ३७ मिनिटे

५ महिने कसून सरावपन्नाशी ओलांडल्यानंतर ९० किमी अंतर पार करणे, माझ्यासाठी आव्हान होते. गेली ५ महिने या स्पर्धेसाठी कसून सराव केला. दक्षिण आफ्रिकेत देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत होता. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर खूप आनंद झाला. सर्व बीडकरांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. योगा प्रतिष्ठान व सर्वच धावपटूंनी मार्गदर्शन केले.- डॉ. संजय जानवळे, धावपट्टू, बीड---

टॅग्स :BeedबीडMarathonमॅरेथॉन