शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये पत्नीसह तिच्या प्रियकराला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:54 IST

प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने पत्नी व प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा येथील तदर्थ सत्र न्यायालयाने (क्र. २) सुनावली.

ठळक मुद्देप्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने पत्नी व प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा येथील तदर्थ सत्र न्यायालयाने (क्र. २) सुनावली. बीड तालुक्यातील बेलुरा येथे २३ मे २०१४ रोजी खुनाचा हा गुन्हा घडला होता.

बेलुरा येथील आशा तुकाराम पांचाळ नामक महिलेचे नवगण राजुरी येथील बाळासाहेब वैद्य नामक इसमाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात आशाचा पती अडसर ठरत होता. त्यामुळे २३ मे २०१४ रोजी पहाटेच्या दरम्यान तुकाराम याचा गळा आवळून खून करण्यात आला. तुकारामच्या मृत्यूनंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून नवगण राजुरी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तुकारामच्या गळ्यावरील व्रण पाहून तो मृत असल्याचे सांगून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. परंतु, डॉक्टरांचा सल्ला न ऐकता हा मृतदेह तसाच परत बेलुरा येथे नेला गेला. दरम्यान गावच्या पोलीस पाटलाने याबाबत बीड ग्रामीण पोलीस ठाण्याला खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी बेलुरा येथे येऊन शवविच्छेदनासाठी मृतदेह बीड येथे जिल्हा रुग्णालयात नेला.

तुकारामचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला, या शवविच्छेदन अहवालानुसार आशा पांचाळ आणि बाळासाहेब वैद्य यांच्याविरुध्द खून करणे तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक फुले यांनी केला. त्यानंतर हे प्रकरण तदर्थ सत्र न्यायालय क्रमांक २ येथे दाखल केले.

परिस्थितीजन्य पुराव्याआधारे तदर्थ सत्र न्या. नाजेरा एस. शेख यांनी आशा पांचाळ व बाळासाहेब वैद्य यांना दोषी ठरवून दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मिलींद वाघिरकर यांनी काम पाहिले. या निकालाकडे नवगण राजुरीसह बेलुरा परिसरातील जनतेचे लक्ष लागले होते.या प्रकरणात २३ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर काही परिस्थितीजन्य पुरावे सादर करण्यात आले. यात आशा, बाळासाहेब यांच्या फोन कॉल रेकॉर्डचा समावेश होता. दोघे शिर्डी येथे एका लॉजमध्ये राहिल्याचे तपासात समोर आले होते.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालयMarathwadaमराठवाडा