शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

मालकीच्या जागा विकसित करण्याचा बीड जिल्हा परिषदेचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 18:53 IST

जिल्हा परिषदेच्या मालकी हक्कातील जागा जि. प. कडेच राहाव्यात, ती जागा बीओटी तत्वावर विकसित करावी असा ठराव गुरुवारी जि. प. च्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

बीड : जिल्हा परिषदेच्या मालकी हक्कातील जागा जि. प. कडेच राहाव्यात, ती जागा बीओटी तत्वावर विकसित करावी असा ठराव गुरुवारी जि. प. च्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या सभेत नूतन सीईओ अमोल येडगे यांच्यासह इतर अधिकारी, विभागप्रमुख, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा जयश्री मस्के, सभापती राजेसाहेब देशमुख, संतोष हंगे, युध्दाजित पंडित, शोभा दरेकर, गटनेते बजरंग सोनवणे, अशोक लोढा यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

सभेत सदस्य अशोक लोढा यांनी हा विषय नमूद करुन ठराव मांडला. मल्टीपर्पज हायस्कूल व कन्या प्रशालेच्या जवळपास दहा एकर जागेचा हा विषय आहे. जून २००९ मध्ये सर्वसाधारण सभेत ठराव २२६ नुसार विकास योजनेतील सर्वे नं. ८३ व ७४ मधील जागा नगर परिषदेस हस्तांतरीत करण्यासाठी शासनाच्या आवश्यक त्या खात्याची परवानगी, नाहरकत घेण्यास प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर २०१० मध्ये शासकीय व बाजारभावाने मुल्यांकनाची माहिती घेऊन अपेक्षित रकमेबाबत बीड न. प. ची सहमती याबाबत अभिप्राय मागविला होता. नंतर मार्च २०१० मध्ये सर्वसाधारण सभेत जि. प. मालकीच्या जागा खाजगी संस्थेस, स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा खाजगी व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या परवानगीशिवाय देता येणार नाही, असे ठरले. तसेच जून २००९ मधील ठराव २२६ रद्द केला होता. तर २०१४ मध्ये या जागेवर इमारत बांधकामास शासनाकडे परवानगी मागितली होती. ही जागा जि. प. च्या मालकीची रहावी आणि ती बीओटीवर विकसित करावी असा ठराव सर्व सदस्यांनी मंजूर केला. 

सभेत शाळा इमारतींच्या दुरवस्थेबद्दल सर्वच सदस्यांनी चर्चा केली. यावर कायापालट समितीची गुरुवारी बैठक होत असून, शाळा दुरुस्तीसाठी डीपीडीसीतून ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अध्यक्ष सविता गोल्हार यांनी सांगितले. पाणीपुरवठ्याच्या बंद योजनांच्या विषयावर ५० टक्के योजना मार्गी लागल्याचे सभेत सांगण्यात आले. तसेच उर्वरित योजना सुरु करण्याबाबत समन्वयातून मार्गी लावण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे सांगण्यात आले. रोहयोत केवळ वैयक्तिक लाभाच्या योजना सुरु आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक रस्ते, बांधबंधिस्तीची कामे सुरु करावी असा मुद्दा काही सदस्यांनी मांडला. 

दलित वस्ती निधी सदस्यांच्या अधिकारात वाटप करासमाजकल्याण विभागाचा दलितवस्ती विकास योजनेतील ४९ कोटी रुपयांचा निधी मार्चपर्यंत वापरावा, यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना सभेत मांडण्यात आली. दलितवस्तीचा निधी जि.प. सदस्यांच्या अधिकारात वाटप करावा, असा मुद्दा योगिनी थोरात यांनी मांडला.जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीबाबत कायापालट योजनेंतर्गत पालकमंत्र्यांनी बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक शाळा दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपये लागणार आहेत. अद्याप एक कोटी रुपयेदेखील निधी मिळालेला नाही. समाज कल्याण विभागाच्या निधीचे नियोजन नाही. जनसुविधाचा निधी अखर्चितच असल्याचे जि. प. सदस्य बजरंग सोनवणे म्हणाले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदBeedबीड