शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बीड जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी राकाँच्या उमेदवारांना सर्वाधिक मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:23 IST

१३ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करू नका, अशा हायकोर्टाच्या आदेशानुसार निकाल घोषित करण्यात आला नाही. 

ठळक मुद्देगतवेळेस भाजपासोबत असलेली शिवसेना यावेळी महाआघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिली. भाजपाचे ३ सदस्य तर काँग्रेसचा १ सदस्य फुटला.

बीड : बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शनिवारी मतदान झाले. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शिवकन्या सिरसाट यांना ३२ तर भाजपाच्या डॉ. योगिनी थोरात यांना २१ मते पडली. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना ३२ तर भाजपाचे भारत काळे यांना २१ मते मिळाली. १३ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करू नका, अशा हायकोर्टाच्या आदेशानुसार निकाल घोषित करण्यात आला नाही. 

बीड जिल्हा परिषदेत महाआघाडीचे संख्याबळ अधिक होते. या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काकू-नाना आघाडी, शिवसेना आणि काँग्रेस अशी आघाडी झाली होती. गतवेळेस भाजपासोबत असलेली शिवसेना यावेळी महाआघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिली. भाजपाचे ३ सदस्य तर काँग्रेसचा १ सदस्य फुटला.   गतनिवडणुकीत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ सदस्यांनी पक्षादेश डावलून भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करुन मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. या सदस्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन आपणास मतदानाचा अधिकार मिळावा, अशी विनंती केली होती. या संदर्भात खंडपीठाने १३ जानेवारीपर्यंत निकाल घोषित करू नये, असे आदेश दिल्यामुळे मतदान होऊनही निकाल घोषित झाला नाही.

पंकजा मुंडे परदेशातजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची महत्त्वाची निवड होत असताना पंकजा मुंडे ह्या परदेशात होत्या. त्यांनी ही जबाबदारी खा.डॉ.प्रीतम मुंडेवर सोपवली होती. परंतु, मागच्या निवडीप्रमाणे कुणीही प्रयत्न केला नाही. इच्छा असूनही शिवसेनेच्या चार सदस्यांना आमच्या सोबत येता आले नाही. लोकशाही प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, शिवसेना ही महाआघाडीसोबत गेल्यामुळे बाकी निकाल स्पष्ट आहे,असे टिष्ट्वट करून पंकजा मुंडे यांनी आधीच आपला पराभव मान्य केला होता.

तेव्हाच भाजपाचा पराभव झाला६० सदस्यांच्या सभागृहात भाजपाचे फक्त १९ सदस्य निवडून आले होते तेव्हाच भाजपाचा पराभव झाला होता. बहुमतासाठी एक मत कमी असताना तोडफोड करून भाजपाने पहिल्या टर्ममध्ये सत्ता हस्तगत केली होती, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची महत्त्वाची निवड होत असताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे ह्या परदेशात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा