शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

बीड शहराचे तीन दिवस होणार ‘स्वच्छ सर्वेक्षण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शहर हगणदारीमुक्त करण्यात बीड पालिकेने यश मिळविल्यानंतर आता शहर १०० टक्के स्वच्छ करण्यासाठी पालिकेने ...

ठळक मुद्देटॉप १० मध्ये येण्यासाठी पालिकेने कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहर हगणदारीमुक्त करण्यात बीड पालिकेने यश मिळविल्यानंतर आता शहर १०० टक्के स्वच्छ करण्यासाठी पालिकेने कंबर कसली होती. याच्या तपासणीसाठी सोमवारपासून तीन दिवस बीड शहरात केंद्रीय पथक तळ ठोकून राहणार आहे. टॉप १० मध्ये येण्याच्या दृष्टीने पालिकेने प्रयत्न केले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ अंतर्गत देशातील ४ हजार ४४ नगर पालिका, महापालिका, पंचायत समितींनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. गतवर्षी बीड पालिकेने ३०२ वा क्रमांक पटकावला होता. यावर्षी मात्र पालिकेने चांगलीच परिश्रम घेतले आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात आवाहन केले. तसेच अ‍ॅपद्वारे तक्रारी घेऊन त्यांचे निरसन केले. यामध्ये बीड पालिकेला बºयापैकी यश आले. हेच मुद्दे गुण वाढविण्यासाठी लाभदायक ठरणार आहेत.

नागरिकांनीही बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी केले. जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक व्ही.टी.तिडके, भागवत जाधव, सुनील काळकुटे, आर.एस.जोगदंड, भारत चांदणे, ज्योती ढाका, वसीम पठाण, गौरव दुधे, आर.व्ही.डहाळे, आर.व्ही. शिनगारे, स्वाती काकडे, राजू वंजारे यांच्यासह स्वच्छता विभाग परिश्रम घेत आहे.

निकाल पंधरा दिवसांनीकेंद्र शासनाने नियुक्त केलेल्या कारवी डेटा मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही संस्थेची समिती सोमवारी बीडमध्ये येणार आहे. ठरवून दिलेल्या मुद्देनिहाय कामांची ते तपासणी करून आढावा घेऊन कागदपत्रांची तपासणीही करणार आहेत. बुधवारी त्यांची तपासणी संपणार आहे. याचा निकाल साधारण १५ ते २० दिवसानंतर जाहीर होईल, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.तीन हजार ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोडआपल्या भागातील तक्रारी मांडण्यासाठी पालिकेने ‘स्वच्छता अ‍ॅप’ सुरू केले होते. याच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचे निरसण करण्यात आले. शहरात जवळपास ३ हजार नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. तसेच १५२१ तक्रारींचे निरसण पालिकेकडून करण्यात आले आहे.

आठ टनावर गांडूळ खताची निर्मितीबीड शहरातून जमा होणाºया ओल्या कचºयापासून पालिकेने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. सध्या ८ टन गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे तर आणखी आठ टन खत बनविण्याच्या तयारीत आहेत. १०० किलो गांडूळ खत विक्री केल्याचेही स्वच्छता विभाग प्रमुख व्ही. टी. तिडके यांनी सांगितले.