शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये चाकुचा धाक दाखवून लुटणारे दोघे १० तासात गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 17:23 IST

पोलिसांनी अवघ्या १० तासांत दोन्ही लुटारू गजाआड केले. ही कारवाई दरोडा प्रतिबंधक पथकाने केली.

बीड : पान खाण्यासाठी टपरीजवळ बाहेर आलेल्या कारचालकास चाकूचा धाक दाखवून ३० हजार रूपयांना लुटल्याची घटना सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास बीड श्हारातील नगर नाक्यावर घडली होती. पोलिसांनी अवघ्या १० तासांत दोन्ही लुटारू गजाआड केले. ही कारवाई दरोडा प्रतिबंधक पथकाने केली.

दिलीप बाजीराव सुरासे (रा.खोकडपुरा, औरंगाबाद) असे कार चालकाचे नाव आहे. सोमवारी ते कार्यक्रमासाठी पत्नीसह कारमधून (क्र.एम.एच.२० बीक्यू ८८००) बीडमध्ये आले होते. रात्री त्यांनी पत्नीला अंबिका चौकात नातेवाईकांच्या घरी सोडले. त्यानंतर सुरासे हे पान खाण्यासाठी बाहेर पडले. कार घेवून ते नगरनाका येथील पानटपरीजवळ आले. मात्र सर्व पानटपऱ्या बंद झाल्याने सुरासे हे तिथेच कारमध्ये मोबाईलवर बोलत बसले होते. याचवेळी दोन चोरट्यांनी त्यांना लुटले.  रोख १० हजार रूपये आणि दोन मोबाईल असा ३० हजार रूपंयाचा ऐवज घेऊन ते फरार झाले. त्यानंतर सुरासे यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. 

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला होता. त्यांनी तात्काळ चक्रे गतीने फिरविली. यामध्ये विकी राजू कांबळे (२५ रा.राजुरीवेस, बीड) व सुयोग मच्छिंद्र प्रधान (१८ रा.साईपॅलेसच्या पाठिमागे, बीड) दोघे असल्याचे समजले. विकीला बार्शी रोडवर तर सुयोगला जालना रोडवर ताब्यात घेतले. या दोघांनाही शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन जाधव, मुंजाबा सौंदरमल, श्रींमत उबाळे, अंकुश दुधाळ, अशोक दुबाले, राहुल शिंदे, महेश चव्हाण, माया साबळे, नारायण कोरडे, भरत कोळेकर, अविनाश गवळी आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडArrestअटकRobberyदरोडाPoliceपोलिस