शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार

By सोमनाथ खताळ | Updated: June 2, 2025 02:09 IST

माजलगाव तालुक्यातील घटना

सोमनाथ खताळ, संतोष स्वामी, दिंद्रुड (बीड): मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री ११ वाजेदरम्यान अपघात होऊन त्यात चार जण ठार तर काही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. मयतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आयशरने ऑटोला जवळपास ५० ते ६० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी दिंद्रुड पोलीस तात्काळ दाखल झाले.

यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील कांही लोक ऑटो क्र. एमएच २३ एन ०२७३ ने रविवारी अकरा ते साडे अकरा वाजेदरम्यान तेलगावकडून माजलगावकडे जात असताना सदरील ऑटो नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपासमोर आला असता समोरून येणाऱ्या आयशर क्र एमएच २३ एम ९२५५ ने ऑटोला जबरदस्त धडक दिली. आयशरने धडक देताच ऑटो जवळपास ५० ते ६० फूट दूर अंतरापर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात ऑटोमधील तीन जण जागीच ठार झाले असून, मयतात एका महिलेचा समावेश आहे. याशिवाय आणखी एकाचाही मृत्यू झाला आहे. सर्व जखमी गंभीर आहेत. त्यांना तेलगाव येथील रूग्णवाहिकेने माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. यात फारूक चाॅद सय्यद, त्यांच्या पत्नी सय्यद शबाना फारूक, शेख नोहिद एजाज आणि फैजान रफिक सय्यद अशी चौघांची नावे आहेत.

मयताच्या जवळ असलेल्या आधारकार्डवरून त्यांची ओळख झाली. अपघातातील इतर मयत व जखमींचे नावे उपलब्ध होऊ शकले नाहीत. आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंखे, खलील मोमीन, सचिन गायकवाड, कानदास बनसोडे, चामनर आदि तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

रविवारी ठरला अपघातवार

मेहकर पंढरपूर पालखी महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव हा रस्ता रविवारी अपघात वार ठरला. दुपारी दोन वाजे दरम्यान महारुद्र लोंढे या दुचाकी स्वराचा ट्रक अपघातात जागीच मृत्यू झाला होता. रात्री साडेअकरा दरम्यान याच रस्त्यावर ऑटो व आयशरच्या धडकेत तीन व्यक्ती ठार झाल्याने  रविवारी पालखी महामार्ग साठी हा रस्ता अपघात वार ठरल्याचे दिसून आले.

टॅग्स :Accidentअपघात