शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Beed: सकाळी १० वाजताच शाळेतील वर्गात दारू पिताना मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:39 IST

तलवाडा आरोग्य केंद्रात पोलिसांकडून वैद्यकीस तपासणी

गेवराई (जि. बीड) : तालुक्यातील श्रीपतअंतरवाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सुधाकर भगवान कुलकर्णी, (रा. आष्टी) यांना ग्रामस्थ व पालकांनी सोमवारी सकाळी १० वाजता शाळेतच दारू पिताना पकडत जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन वैद्यकीय तपासणी केली आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

गेवराई तालुक्यातील श्रीपतअंतरवाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सुधाकर कुलकर्णी हे कार्यरत असून सोमवारी ते नेहमीप्रमाणे शाळेत आले. सकाळी १० वाजता शाळेतील वर्गातच दारू पिताना त्यांना पालकांनी पाहिले. त्यानंतर गावातील अनेक पालकांनी गर्दी करत मुख्याध्यापकाचे दारू पिताना फोटो व व्हिडिओ घेतले. त्यांनतर ग्रामस्थांनी तलवाडा पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी नशेतील मुख्याध्यापकास थेट जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात वैद्यकीस तपासणी केली. मुख्याध्यापकास तलवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, यापूर्वीही मुख्याध्यापक कुलकर्णी हे दारू पिऊन शाळेत येतात, अशी तक्रार ग्रामस्थांनी गेवराई येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे दिलेली होती.

मुख्याध्यापक दारू पिताना दिसलेमला सकाळी साडेदहा वाजता गावातील नागरिकांचा फोन आला की, मुख्याध्यापक हे वर्गात दारू पित आहेत. त्यामुळे मी तेथे जाऊन पाहणी केली असता मुख्याध्यापक त्या ठिकाणी दारू पिलेले होते, असे सरपंच उमेश आर्दड यांनी सांगितले.

वैद्यकीय तपासणीची मागणी पोलिसांकडे केलीविस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखास शाळेत पाठवले. मुख्याध्यापकाने दारू घेतली असल्याचे कळल्यांनतर मुख्याध्यापकाची वैद्यकीस तपासणी करावी, अशी मागणी मी पोलिसांकडे केली. त्यानंतर तपासणी करण्यात आली. या प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे.- धनंजय शिंदे, गटशिक्षणाधिकारी, गेवराई

टॅग्स :Beedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाCrime Newsगुन्हेगारी