Beed Masjid Blast : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडासह विविध प्रकरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. आता याच बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रमजान ईदच्या एक दिवस आधी बीडमधील एका मशिदीतस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेवराई तालुक्यातील गढी-माजलगाव रोडवरील अर्धमसला गावातील मशिदीत शनिवार/रविवारी मध्यरात्री हा स्फोट झाला.
दोन आरोपींना अटकगुढी पाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच ही घटना घडल्यामुळे जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्फोट उघडवून आणल्यामुळे मशिदीची भिंत कोसळली, तसेच मोठा खड्डाही पडला. सुदैवाने या सौम्य स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, घटनास्थळी आयजी, पोलीस अधीक्षकांसह तलवाडा पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अटकेपूर्वी बनवला व्हिडिओया प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे, असे दोन आरोपींची नावे आहेत. स्फोटापूर्वी विजय गव्हाणे याने सोशल मीडियावर जिलेटीनच्या कांड्यासह स्वत:चा व्हिडिओ पोस्ट केला होता. हातात जिलेटिनच्या काठ्या आणि तोंडात सिगारेट घेऊन तो व्हिडिओ बनवत होता. उद्या रमजान ईद असल्यामुळे पोलिसांनी मुस्लिम समुदायाला शांत राहण्याचे आणि कुठल्याही अफवांवर विश्वासन ठेवण्याचे आवाहन केले आहे.
वरिष्ठ पोलीस अधकाऱ्यांनी केला पंचनामारमजानच्या काळात मशिदीत असा स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बीड जिल्ह्याचे एसपी आणि छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी व्हिडीओग्राफीच्या माध्यमातून पंचनामा केला. आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली.