शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट' करण्याचा प्रयत्न, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 17:04 IST

पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 103 जिलेटीन कांड्या जप्त केल्या आहेत.

परळी: बीड जिल्ह्यातील परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील राख साठवणूक तलावात राख मोकळी करण्यासाठी जिलेटीनचा वापर करून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी दोघाना परळी ग्रामीण पोलिसांनी शनिवारी अटक केली. हरीचंद्र चव्हाण व बालाजी जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी व परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

औष्णिक विद्युत केंद्राचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र आहे, या ठिकाणी जिलेटिनच्या कांड्याचा वापर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी या जिलेटिनच्या कांड्याचा वापर जमलेली राख मोकळी करण्यासाठी करणार होते. कांड्या आणि वायरिंगवगैरे सर्व तयारी झाली होती, पण त्यापूर्वीच परळी ग्रामीण पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तब्बल 103   जिलेटिनच्या कांड्या व वायर जप्त करण्यात आले आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.

परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातो, कोळसा जळल्यानंतर पाईपलाईनद्वारे त्याची राख विद्युत केंद्राच्या परिसरातील दाऊतपुर शिवार येथील राख साठवण केंद्रात सोडली जाते. या राखेचा वीट, सिमेंट आदी कामांमध्ये वापर केला जातो. बऱ्याच काळापासून पडलेली राख मोकळी करण्यासाठी ही ब्लास्टिंग केली जात होती. पण, विद्युत केंद्राच्या सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच ही बाब निदर्शनास आणली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय खोडेवाड हे करत आहेत. 

'औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या राख तळ्यात राख मोकळी करण्यासाठी जिलेटीन नामक स्फोटके वापरत असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांना आढळून आले. यानंतर कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून सदरील 3 व्यक्तींना पकडून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसून, औष्णिक वीज निर्मिती केंद्र घटनास्थळापासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. सदरील घटनेमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.- मोहन आव्हाड, मुख्य अभियंता, परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र.

टॅग्स :BeedबीडBlastस्फोटparli-acपरळी