शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:30 IST

हाके आणि पंडित समर्थक समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

बीड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करून गाडीवर दगडफेक झाल्याची घटना आज दुपारी साडेपाच वाजेच्या दरम्यान गेवराईमध्ये छत्रपती शिवाजी चौकात घडली. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती असून यामुळे हाके आणि पंडित समर्थक समोरासमोर येऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या सहकाऱ्यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या समर्थनाथ गेवराईमध्ये बॅनर लावले होते. यावरून बीड दौऱ्यावरील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार पंडित यांच्यावर टीका केली. त्यानंतर आज बीडकडे जात असताना छत्रपती शिवाजी चौकात हाके थांबले होते. यावेळी आमदार पंडित समर्थक अचानक आक्रमक झाले. त्यांनी हाके यांच्यावर हल्ला चढवला, मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली. त्यानंतर हाके आणि पंडित समर्थक समोरसमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत हाके यांना बीडच्या दिशेने पुढे रवाना केले. 

जेथे पुतळा जाळला तेथेच हल्लाआमदार पंडित यांच्यावर टीका केल्याने रविवारी याचा चौकात हाके यांचा पुतळा जाळण्यात आला होता. त्यानंतर आज कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्याच चौकात पोहचले होते. चौकात खाली उतरून कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलत असतानाच हाके यांच्यावर आमदार पंडित यांचे कार्यकर्ते धावून आले. हाके यांच्या गाडीवर चढून हल्ला करण्यात आला. मात्र, पोलिस आणि हाके समर्थकांनी वेळीच धाव घेतली. हाके यांना गाडीत बसवून तेथून रवाना करण्यात आले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

हाके समाजात तेढ निर्माण करत आहेतसमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान हाके बीड जिल्ह्यात येऊन करत आहेत. अतिशय खालच्या पातळीवर माझ्यावर टीका करण्यात आली. यावर मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आज माझ्या सहकाऱ्यांनी हाके यांच्या क्रियेवर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या सहकाऱ्यांनी जरांगे यांचे समर्थनार्थ बॅनर लावले तर काय अडचण आहे. - विजयसिंह पंडित, आमदार, गेवराई

मुख्यमंत्री सुरक्षित नाहीत, आमचे कायमुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका करण्यात येत आहे. मुंबईकडे मोठा लोंढा निघाला आहे, परिस्थिती कठीण आहे. माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला.- लक्ष्मण हाके, ओबीसी नेते

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड