शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात जालन्याचा डॉक्टर ताब्यात; आरोपींची साखळी वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 13:10 IST

लोकमत इम्पॅक्ट: जालना कारागृहात पोहोचले बीड पोलीस

- सोमनाथ खताळबीड : अवैध गर्भपात प्रकरणात जालन्याच्या सतीश गवारे या डॉक्टरला बीड पोलिसांनी जालना कारागृहातून गुरुवारी रात्री ८ वाजता ताब्यात घेतले आहे. ही माहिती गुरुवारी रात्री ११ वाजता समोर आली. बीड आणि जालना न्यायालयातून यासाठी परवानगी घेण्यात आली होती. या प्रकरणात 'लोकमत'ने सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत ही कारवाई केली आहे.

बीड तालुक्यातील शीतल गाडे या महिलेचा अवैध गर्भपात करताना ५ जून रोजी मृत्यू झाला होता. यात पिंपळनेर पोलीस ठाण्यात सासरा, पती, भाऊ, लॅबचालक, सीमा मावशी, शिकाऊ डॉक्टर, एजंट यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. यातील सिमाने आत्महत्या केली असून, बाकी सर्व बीडच्या कारागृहात आहेत. यातील शिकाऊ डॉक्टर सतीश सोनवणे हा मार्च २०२२ पासून गेवराईत एजंट मनीषा सानपच्या घरी येऊन सोनोग्राफी मशीनमधून गर्भलिंग तपासणी करत होता. यासाठी त्याला १० हजार रुपये, तर एजंट मनीषाला १५ हजार रुपये मिळत होते. हाच सोनवणे जालना येथे डॉ. गवारेकडे शिकायला होता. तेथूनच तो गर्भलिंग निदान करण्याचे शिकला.

याबाबत त्याने पोलिसांना आणि आरोग्य विभागाला तसा जबाबही दिला होता. तरीही बीड पाेलीस डॉ. गवारेला अटक करण्यासाठी आखडता हात घेत होते. याबाबत 'लोकमत'ने तपासावर आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताच बीड पोलिसांनी न्यायालयातून आदेश घेत जालना कारागृहातून रात्री उशिरा गवारेला ताब्यात घेतले. त्याला आता शुक्रवारी बीडच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. ताब्यात घेतल्याची माहिती बीडचे उपअधीक्षक संतोष वाळके यांनी 'लोकमत'ला दिली.

'लोकमत'च्या पाठपुराव्याला यशसामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या प्रकरणात 'लोकमत'ने सुरुवातीपासून आवाज उठवला. पोलिसांचा संथ तपास, आरोपींची पाठराखण, सोनोग्राफी मशीन कोणाची, याचा शोध न लावणे, आरोपींना लवकरच न्यायालयीन कोठडी मिळणे, पोलीस कोठडीत असतानाही ठोस माहिती न मिळणे, आदी मुद्दे उपस्थित केले होते. 'लोकमत'चा पाठपुरावा सुरू राहिल्यानेच बीड पोलिसांनी कारवाईला गती देत डॉ. गवारेला ताब्यात घेतले. 'लोकमत'च्या पाठपुराव्याला यानिमित्ताने यश आले असून, आणखी साखळी उघड होण्यात गवारेची मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीAbortionगर्भपात