Beed: वरबाप म्हणतात, बालविवाह नव्हे तो साखरपुडा, समितीने फोटो दाखवून केला भंडाफोड, मुलगा, मुलीच्या आई-वडिलांसह वऱ्हाडींवर गुन्हा

By सोमनाथ खताळ | Published: October 25, 2023 10:30 PM2023-10-25T22:30:38+5:302023-10-25T22:31:04+5:30

Beed: भवानवाडी येथील २१ वर्षीय मुलाचा विवाह कारेगव्हाण येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झाला. या विवाहाची कोणालाही माहिती होऊ दिली नाही; परंतु काही लोकांनी याचे फोटो बालकल्याण समितीला पाठविले.

Beed: Father-in-law says, child marriage is not a sugar-puda, the committee showed the photo and busted, crime against bridegroom along with boy, girl's parents | Beed: वरबाप म्हणतात, बालविवाह नव्हे तो साखरपुडा, समितीने फोटो दाखवून केला भंडाफोड, मुलगा, मुलीच्या आई-वडिलांसह वऱ्हाडींवर गुन्हा

Beed: वरबाप म्हणतात, बालविवाह नव्हे तो साखरपुडा, समितीने फोटो दाखवून केला भंडाफोड, मुलगा, मुलीच्या आई-वडिलांसह वऱ्हाडींवर गुन्हा

- सोमनाथ खताळ
बीड -  २१ वर्षांच्या मुलासोबत अवघ्या नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीचा विवाह लावण्यात आला. बालकल्याण समितीकडे पुरावे येताच ग्रामसेवकाला चौकशीसाठी पाठविले. मुलगी व मुलगा या दोघांच्या आई-वडिलांना विचारणा केली. त्यांनी हा विवाह नसून केवळ साखरपुडा झाल्याचे सांगितले; परंतु समितीने दिलेले फाेटो दाखवताच त्यांचा भंडाफोड झाला. हा प्रकार बीड तालुक्यातील भवानवाडी येथे २६ सप्टेंबर रोजी घडला होता. यात २५ ऑक्टोबर राेजी पालकांसह वऱ्हाडींवर व पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भवानवाडी येथील २१ वर्षीय मुलाचा विवाह कारेगव्हाण येथील नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झाला. या विवाहाची कोणालाही माहिती होऊ दिली नाही; परंतु काही लोकांनी याचे फोटो बालकल्याण समितीला पाठविले. समितीने ग्रामसेवकामार्फत गावात जाऊन चौकशी केली, तर मुलगा व मुलीच्या वडिलांनी हा विवाह झालाच नाही, असा पवित्रा घेतला. केवळ साखरपुडा झाल्याचा दावा त्यांनी केला; परंतु ग्रामसेवकांनी समितीने पाठविलेले फोटो दाखविताच सर्वच शांत झाले. आपला भंडाफोड झाल्याचे लक्षात येताच त्यांनी विनंती केली; परंतु समितीचा आदेश असल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामसेवकांनी पिंपळनेर पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी ग्रामसेवक रवींद्र सातपुते यांच्या फिर्यादीवरून नवरदेवासह त्याचे आई-वडील व मुलींचे आई-वडील आणि वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती हे करत आहेत.

Web Title: Beed: Father-in-law says, child marriage is not a sugar-puda, the committee showed the photo and busted, crime against bridegroom along with boy, girl's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड