शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Beed: जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबईला निघालेल्या केजमधील शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:59 IST

जुन्नर परिसरात आंदोलकाचा वाहनातचा हृद्यविकाराच्या धक्क्याने झाला मृत्यू

केज (बीड) : तालुक्यातील वरपगाव येथील २० कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी दोन वाहनातून रवाना झाले आहेत. प्रवासादरम्यान आज, गुरूवारी ( दि. २८ ) सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान जुन्नर परिसरात आंदोलक सतीश ज्ञानोबा देशमुख (४५) या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

वरपगांव येथील २० आंदोलक बुधवारी सकाळी ६ वाजता वरपगांव येथून दोन वाहनातून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. जुन्नर परिसरात त्यांनी बुधवारी रात्री मुक्काम करुन गुरुवारी ( दि. २८ ) सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान चहा, नाष्टा करुन ते मुंबईकडे जात असताना वाहनातच सतीश ज्ञानोबा देशमुख ( रा वरपगांव) यांचा हृदयविकाराच्या  धक्क्याने मृत्यू झाला.

नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक जगदेवअप्पा पाटील, जमादार तळपाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणी केल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदेवअप्पा पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.सतीश देशमुख यांच्या पश्चच्यात आई, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

प्रा गणेश धपाटे अपघातात जखमीकेज तालुक्यातील भाटुंबा येथील  प्रा. गणेश धपाटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या रॅलीतील सहभागी झाले होते. मंचरजवळ त्यांचे सहकारी चहा घेण्यासाठी थांबले असता रस्ता ओलांडताना एका भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात धपाटे गंभीर जखमी आहेत. त्यांच्या एका मांडीचे हाड मोडले आसून छातीला व डोक्यालाही मार लागला आहे. त्यांच्यावर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे सहकारी प्रा सुनिल सोळंके यांनी दिली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBeedबीड