शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, शेतकरी पुत्रानं राज्यपालांना लिहिलेल्या पत्रानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 08:26 IST

एका शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री करण्याच्या मागणीचं राज्यपालांना पत्र लिहिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

बीड: एका शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री करण्याच्या मागणीचं राज्यपालांना पत्र लिहिल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरूनच रस्सीखेच सुरू असताना शेतकरी पुत्रानं ही मागणी केल्यानं सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरत आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहिफळ गावातल्या श्रीकांत विष्णू गदळे यांनी ही मागणी केली आहे.श्रीकांत हे मागील काही वर्षांपासून राजकारण आणि समाजकारण करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातल्या शिवसेना-भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत माझ्याकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार द्या, अशा आशयाचं पत्र लिहून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतात पेरलेल्या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे.  शिवसेना-भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. हा तिढा सुटत नाही, तोपर्यंत राज्यातील जनतेच्या हितासाठी असा निर्णय घ्यावा, असं श्रीकांत यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला मुख्यमंत्री करा. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मी तुम्हाला विश्वास देतो. माझ्या या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी राज्यपालांना दिला आहे. श्रीकांत यांनी राज्यपालांना उद्देशून लिहिलेलं हे पत्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं असून, ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आहे. 

टॅग्स :Mantralayaमंत्रालय