शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Beed: अर्धामसलातील धार्मिक स्थळात स्फोट; आरोपींवर दहशतवादी कृत्याचे कलम वाढविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 20:02 IST

यूएपीए कायद्यातील कलम १५, १६, १८ व भारतीय न्याय संहितातेतील कलम ११३ हे कलम वाढविले आहेत.

बीड : गेवराई तालुक्यातील अर्धामसला येथे रमजान ईदच्या आदल्या दिवशीच दोन समाजकंटकांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जिलेटीन कांड्या लावून स्फोट घडवून आणला होता. या प्रकरणात दोन्ही आरोपी अटक होते. त्यांना पोलिस कोठडीसाठी शनिवारी बीडच्या न्यायालयात हजर केले. या वेळी त्यांच्याविरोधात 'यूएपीए' म्हणजेच दहशतवादी कृत्य केल्याचे कलम वाढविले आहेत.

अर्धामसला येथे जुन्या वादातून वाद झाले. या वेळी गावातीलच विजय गव्हाणे व श्रीराम सागडे यांनी जिलेटीन लावून धार्मिक स्थळात स्फोट घडवून आणला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. परंतु पाेलिसांनी दोन्ही आरोपींना तातडीने अटक केल्याने आणि हिंदू-मुस्लीम समाजात शांततेची बैठक घेतल्याने हे वातावरण शांत झाले होते. यातील आरोपींना दोन वेळा पोलिस कोठडी मिळाल्यानंतर शनिवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले. यावेळी यूएपीए कायद्यातील कलम १५, १६, १८ व भारतीय न्याय संहितातेतील कलम ११३ हे कलम वाढविले आहेत. पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी ही माहिती दिली. तसेच दोन्ही आरोपींना ९ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय आहे यूएपीए कायदा?यूएपीए कायद्यातील कलम १६ म्हणजे दहशवादी कृत्य आणि १८ म्हणजे कट रचणे. हा गुन्हा गंभीर असतो. यातील आरोपीला कमीत कमी ५ वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यूएपीए कायद्याला मराठीत बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा असे यास म्हटले जाते. दहशतवादी कारवाया करणे किंवा त्या कृतीत सामील होणे, असाच अर्थ यूएपीएचा होतो. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन-समर्थन देणे, दहशतवाद घडवण्यासाठी आर्थिक मदत करणे, प्लॅनिंग करणे, अशी व्याख्या या कायद्याची आहे.

पुढील तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडेअर्धामसला प्रकरणात यूएपीएचे कलम वाढविले आहेत. तसेच दोन्ही आरोपींना ९ एप्रिल पर्यंत पाेलिस कोठडी सुनावली. आता याचा पुढील तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे.- उस्मान शेख, पोलिस निरीक्षक, एलसीबी बीड

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याterroristदहशतवादीBeedबीड