शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा होणार पाणीदार; २३५ गावांत होणार कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात उन्हाळ््याचे दिवस आले की टँकर युक्त जिल्हा होत असे. मात्र, ‘जलयुक्त शिवार’ ही योजना शासनाने प्रभावीपणे राबवल्यामुळे बीडची वाटचाल दुष्काळमुक्त जिल्ह्याच्या दिशेने होताना दिसत आहे. याच योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्यावर्षी १९५ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे ही गावे जलयुक्त झाली व पाणीटंचाईवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात उन्हाळ््याचे दिवस आले की टँकर युक्त जिल्हा होत असे. मात्र, ‘जलयुक्त शिवार’ ही योजना शासनाने प्रभावीपणे राबवल्यामुळे बीडची वाटचाल दुष्काळमुक्त जिल्ह्याच्या दिशेने होताना दिसत आहे. याच योजनेअंतर्गत जिल्ह्यात गेल्यावर्षी १९५ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे ही गावे जलयुक्त झाली व पाणीटंचाईवर मात करण्यात यश मिळाले. यावर्षी देखील शासनाने जिल्ह्यात भरीव तरतूद केली आहे. २०१८-१९ या वर्षात २३५ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यात बीड जिल्ह्याची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून झाली होती. नागरिकांना उन्हळ््याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. शेतीसाठी देखील पुरेसे पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली होती. या प्रश्नांवर उपाय म्हणून शासन व इतर सामाजिक क्षेत्रात काम करणाºया संघटनांनी पुढे येत जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली, त्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली.

यावर्षी देखील जिल्ह्यात शासनाने जलयुक्त योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करत संपूर्ण जिल्हा पाणीदार होण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे. त्याचा फायदा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी झाला आहे. त्यामुळे शेती फायद्याची ठरत आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाणी साठ्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाणीटंचाई भासणार नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारMarathwadaमराठवाडाWaterपाणी