शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

बीड जिल्ह्यात ६८.१२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:13 IST

जिल्ह्यातील सहा मतदार संघांत सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्राप्त माहितीनुसार अंदाजे ६८.१२ टक्के मतदान झाले. पावसामुळे व्यत्यय आला तरी मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला.

ठळक मुद्देनवमतदारांमध्ये उत्साह : व्होटर स्लीप मिळाल्या नसल्याच्या तक्रारी

बीड : जिल्ह्यातील सहा मतदार संघांत सोमवारी झालेल्या निवडणुकीत प्राप्त माहितीनुसार अंदाजे ६८.१२ टक्के मतदान झाले. पावसामुळे व्यत्यय आला तरी मतदारांनी आपला हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा केला. तर जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन, राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शांत, संयमी भूमिकेमुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.जिल्ह्यात २३२१ मतदान केंद्रे होती. १२ सखी मतदान केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन सांभाळले. तर ६ मॉडेल मतदान केंद्रांमुळे त्या केंद्र परिसरात उत्साह दिसला. मतदान केंद्र शोधत येणाºया बहुतांश मतदारांनी त्यांना बीएलओंकडून व्होटर स्लीप मिळाल्याच्या नसल्याच्या तक्रारी केल्या.सायंकाळी ६ वाजता मतदान वेळ संपली. या वेळेपर्यंत केंद्रात आलेल्या मतदारांना मतदान करता आले. त्यानंतर निवडणूक कर्मचारी यंत्र व साहित्यासह अधिग्रहित केलेल्या वाहनातून मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचत होते. रात्री दहा वाजेपर्यंत गेवराई मतदार संघातील ३९५ पैकी २०१ केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी पोहोचले होते, माजलगाव मतदार संघातील सर्व ३७४ मतदान पथक पोहोचले होते. बीडमध्ये ३७४ पैकी २२६ पथक पोहोचले होते. आष्टीतील ४३८ पैकी २४७ पथक पोहोचले होते. केजचे ४०५ पैकी २५० आणि परळीचे ३३५ पैकी १६९ पथक मुख्यालयात पोहोचले होते.पूर आल्याने कर्मचारी अडकलेबीड तालुक्यातील राजुरीजवळ नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे मतदान यंत्रे घेऊन येणाºया दोन बसेस व त्यामधील ५० ते ६० कर्मचारी साडेनऊच्या सुमारास अडकले होते.प्रशासनाची तत्परताबहुतांश मतदान केंद्रांवर व्हीलचेअर नसल्याने दिव्यांग मतदारांना खुर्चीद्वारे, तसेच खांद्यावरुन न्यावे लागले. तर मतदान केंद्राच्या ठिकाणी दूतांनी दिव्यांगांसह वृध्द मतदारांना आधार देत कर्तव्य बजावले. पुरेशा पोलीस बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.चिखल, पावसातही लोकशाहीचा उत्सवबीड : रविवार आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे विधानसभा निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतदानावर परिणाम झाला असलातरी उघडीप झाल्यानंतर मतदानाचा ओघ कमालीचा वाढला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण ६० च्या पुढे गेले.पहाटे मॉकपोल झाल्यानंतर ठीक सात वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली. मात्र पावसामुळे केंद्र परिसरात काही ठिकाणी पाणी साचले होते. तर काही ठिकाणी मतदारांना चिखल तुडवत जावे लागले. पावसाची तमा न बाळगता मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केले. काही मतदारांनी छत्रीचा वापर करत केंद्र गाठले.अंबाजोगाईसह तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत तुरळक गर्दी होती. ११ वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. परळीत पावसामुळे ९ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. गेवराई शहरातील जिल्हा परिषद शाळा केंद्राभोवती चिखल साचल्याने मतदारांना कसरत करत मतदानासाठी जावे लागले. माजलगाव मतदार संघात वडवणी, धारुर तालुक्यांचा समावेश आहे. सकाळी सर्वत्र पाऊस असल्याने दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. सखी मतदान केंद्र परिसरात अनेक ठिकाणी चिखल झाल्याने या केंद्रावर कमानीची सजावट करता आली नाही. तर काही केंद्रावर चिखल झाल्याने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिभा गोरे यांनी स्वत: उभा राहून रस्ता तयार करु न घेतला. आष्टी तालुक्यातही पाऊस व चिखलाचा परिणाम झाला. बीडमध्येही पहाटे तुरळक पाऊस आणि गारठ्यामुळे सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर वर्दळ थंडावली होती. बारा वाजेनंतर मतदानासाठी मतदार घराबाहेर पडत होते.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडVotingमतदान