शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्र कमी असल्यानेच बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळाचे संकट

By अनिल भंडारी | Updated: January 15, 2024 19:49 IST

राजेंद्रसिंह राणा : जलसाक्षरतेसाठी काम करण्याची गरज

बीड : वनक्षेत्र आणि हरित क्षेत्र कमी असल्याने बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळजन्य स्थिती निर्माण होते. दुष्काळमुक्तीसाठी जल पुनर्भरणाबरोबरच नद्या जिवंत ठेवण्याची गरज आहे. सरकार फक्त नियंत्रणाचे काम करू शकते, पाऊसप्रमाण वाढविण्यासाठी वनक्षेत्र वाढवून हरितभूमी करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन वॉटरमॅन राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

सोमवारी अंबाजोगाई येथे कार्यक्रमानिमित्त ते आले होते. दुपारी बीड येथे त्यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, चला जाणूया नदीला उपक्रमांतर्गत ११८ नद्यांवर काम करण्यात आले. त्याचा अहवाल शासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील पाच नद्यांचा अभ्यास करून कृती आराखडा तयार केला आहे.

दुष्काळ पडण्याची कारणे शोधून बदलत्या पाऊस पद्धतीप्रमाणे पीक पद्धती जोडण्याचे काम करावे लागणार आहे. हिरवाई नसल्याने दुष्काळ पडतो. त्यामुळे कार्बनचे रूपांतर मातीत होत नाही. हिरवाई निर्माण करून जमिनीत पावसाचे जिरलेल्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. पूर्वी सेंद्रिय शेती पद्धतीमुळे अशी विदारकता नव्हती. परंतु, रासायनिक शेती वाढल्याने ही विदारकता निर्माण होत असल्याचे राणा म्हणाले. यावेळी चला जाणूया नदीला उपक्रमाचे राज्य सदस्य अनिकेत लोहिया, नरेंद्र चुग, रमाकांत कुलकर्णी, जिल्हा सदस्य एच. पी. देशमुख, आदी उपस्थित होते.

जलसाठा वाढविण्यासाठी ॲक्शन प्लानजलसाठा वाढविण्यासाठी तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी वाचविण्यासाठी ओढे, नाले, नदी, तलाव, आदी जलस्रोतांवरील अतिक्रमणे काढणे, त्यांची ओळख, मालकी व क्षेत्र निश्चित करणे, नादुरुस्त सिमेंट नाला, बंधारे, केटीवेअर दुरुस्त करून पुन्हा पूर्वक्षमतेने स्थापित करणे, सांडपाणी व्यवस्थापन तसेच वनस्पतीचा उपयोग करणे, आदी बाबींचा नदी सुधार कृती आराखड्यात समावेश आहे.

टॅग्स :forestजंगलBeedबीड