शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रुग्णालयात उपचार योग्य होत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांकडून परिचारिकेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:12 IST

माझ्या आईला सलाईन का लावत नाहीस ? असे म्हणत मारहाण

बीड : माझ्या आईला सलाईन का लावत नाहीस ? असे म्हणत अधि-परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. सोडविण्यासाठी गेलेल्या परिसेविकेलाही मारहाण झाली. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ८ मध्ये घडली. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ८ मध्ये अनिता रावण कांबळे यांची बुधवारी रात्री ड्युटी होती. त्यांच्याच वार्डमध्ये शेख शमीम नावाची महिला रुग्ण तापेच्या आजारामुळे दोन दिवसांपूर्वी दाखल झाली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास शेख यांचा मुलगा रुग्णालयात आला. माझ्या आईला सलाईन का लावत नाहीस ? असे म्हणत त्याने कांबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी आदेश न दिल्यामुळे मी सलाईन लावू शकत नाही असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपीने कांबळे यांचा हात पकडला. तात्काळ कांबळे यांनी हा प्रकार परिसेविका संगीता दिंडकर यांना कळविला. त्यांनी कर्मचा-यांसह वार्डमध्ये धाव घेतली. भैय्या क्या हुआ असे विचारताच आरोपीने दिंडकर यांचाही हात पकडून मुरगाळला. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या शारदा गायकवाड यांनाही आरोपीने धक्काबुक्की केली.

हा प्रकार समजल्यानंतर सर्व कर्मचा-यांनी धाव घेताच आरोपीने रुग्णालयातून पलायन केले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना प्रकार सांगण्यात आला. रात्रीच्या सुमारास त्यांनी रुग्णालयात भेट दिली. त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात शेख शमीम यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक तास कामबंदअधि-परिचारिका व परिसेविकेला धक्काबुक्की झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचाºयांनी एक तास कामबंद आंदोलन केले. मात्र, रुग्णांची काळजी घेत हे आंदोलन मागे घेण्यात आले.

कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरणडॉक्टर, परिचारिका आपल्याकडे लक्ष देत नाहीत, सलाईन लावत नाहीत, इंजेक्शन देत नाहीत असा गैरसमज रुग्ण व नातेवाईकांमध्ये असतो. मात्र, गरज नसताना असे उपचार करणे धोक्याचे असू शकते. याच गैरसमजूतीतून वाद उद्भवतात. बुधवारचा प्रकारही असाच काहीसा होता. या घटनेमुळे मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडCrime Newsगुन्हेगारी