शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात कोवळ्या कळ्यांवर वासनांधतेची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:38 IST

बीड जिल्ह्यात गतवर्षी तब्बल ३२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत, तर पोक्सो अंतर्गत जिल्ह्यात ७१ गुन्ह्यांची नोंद आहे. या आकडेवारीवरुन जिल्ह्यात आजही महिला असुरक्षित असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देमागील वर्षात ३२ अल्पवयीन मुली अत्याचाराच्या शिकार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वेगवेगळे आमिष दाखवून ओळखीचेच लोक अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. जिल्ह्यात गतवर्षी तब्बल ३२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत, तर पोक्सो अंतर्गत जिल्ह्यात ७१ गुन्ह्यांची नोंद आहे. या आकडेवारीवरुन जिल्ह्यात आजही महिला असुरक्षित असल्याचे दिसून येते. त्यांच्या मनात आजही ‘भय’ कायम असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार कोवळ्या वयातच मुलींना वासनांधतेला बळी पडावे लागत आहे.

जम्मू काश्मीरमधील कटुआ व उन्नाव येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांनी देश हादरुन टाकला. त्यानंतर बीडसह देशात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. मूक मोर्चे काढून यातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणीही मोर्चातून झाली. हा सर्व प्रकार डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याची परिस्थिती पाहिली असता २०१७ या वर्षात तब्बल ७१ गुन्हे पोक्सोअंतर्गत विविध ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे समोर आले.

पोलिसांकडून जनजागृतीपोलीस प्रशासनाने महिला व मुलीच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकाच्या माध्यमातून छेडछाड करणाऱ्यांसह महिला व मुलींना त्रास देणाºयांवर कारवाई केली जाते. तसेच शाळा, महाविद्यालयात जाऊन घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मुलींना मार्गदर्शन व शिक्षिकांना सूचना केल्या जातात. त्याचे पालन करण्याचे आवाहन दामिनी पथकातर्फे होते.परिचितांकडूनच भीतीदाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये बहुतांश आरोपी हे ओळखीचेच आहेत, तर काही गुन्ह्यांमध्ये नातेवाईकच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपली मुलगी एखाद्या व्यक्तीबरोबर पाठविताना, बोलताना व एकटी घरी असताना तिच्याशी वारंवार संपर्क करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा घटनांना नक्कीच आळा बसेल असे पोलिसांचे म्हणणे आहे.पोक्सो कायद्यात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणे, विनयभंग करणे, पळवून नेणे, छेडछाड करणे यांचा समावेश आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांवरुन जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना कमी होत नसल्याचे दिसून येते. या घटना रोखण्यासाठी महिला व मुलींनी तसेच त्यांच्या पालकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे.

तीन महिन्यात ११७ कारवायापोलीस अधीक्षकांनी नियुक्त केलेल्या दामिनी (जिल्हा) या पथकाने मागील तीन महिन्यात ११७ कारवाया केल्या आहेत. पथकात पोलीस उपनिरीक्षक भारत माने, एस. एस. गर्जे, आर. जी. सांगळे, एस. ए. जाधवर, जयश्री घोडके, पी. आर. राठोड, व्ही. बी. राठोड यांचा समावेश आहे.या आकडेवारीवरुन जिल्ह्यात आजही मुलींची छेड काढली जात असल्याचे दिसून येते. या घटना रोखण्यासाठी दामिनी पथकाने आणखी सक्रिय होणे गरजेचे आहे. बीड तालुक्यात पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड या दामिनी पथकाचे काम पाहत आहेत. ११ तालुक्यांमध्ये ११ पथके कार्यरत आहेत.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारMarathwadaमराठवाडा