शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Beed: बिबट्याची क्रूर शिकार! शेतात जनावरांची राखण करणाऱ्या शेतकऱ्याचा फडशा पाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 11:53 IST

दोनशे ग्रामस्थांनी रात्री उशिरा शोधला मृतदेह; बावी-दरेवाडी परिसरात भयावह शांतता

- नितीन कांबळेकडा (बीड): नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना घेऊन शेतात गेलेल्या राजेंद्र विश्वनाथ गोल्हार (वय ३६) यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत त्यांचा फडशा पाडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आष्टी तालुक्यातील बावी, दरेवाडी परिसरात रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात गेलेल्या एका सामान्य कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे असे विदारक अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

रात्री उशिरा सुरू झाले शोधकार्यरविवारी सकाळी गेलेले राजेंद्र गोल्हार रात्र झाली तरी घरी परतले नाहीत, यामुळे कुटुंबात चिंतेचे आणि भीतीने वातावरण निर्माण झाले. बिबट्याच्या हल्ल्याचा संशय येताच, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. वनविभाग, आष्टी प्रशासन, पोलीस आणि तब्बल दोनशे ते अडीचशे ग्रामस्थांनी एकत्र येत रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. अखेर या शोधमोहिमेला यश आले, पण ते अत्यंत भयावह स्वरूपाचे होते.

विदारक दृश्याने गाव हादरलेरात्री उशिरा राजेंद्र गोल्हार यांचा मृतदेह आढळून आला. बिबट्याच्या क्रूर हल्ल्यामुळे मृतदेहाची स्थिती अत्यंत विदारक होती; त्यांच्या शरीराचा एक पाय मृतदेहाला नव्हता आणि गळ्याला गंभीर इजा झाली होती. हे दृश्य पाहणाऱ्या गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आणि परिसरात भीतीची भयावह शांतता पसरली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय ताफा घटनास्थळी दाखल झाला.

अंधारात बिबट्याचे संकट अधिकया पार्श्वभूमीवर, आष्टी प्रशासनाने नागरिकांना रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये आणि विशेषत: संध्याकाळनंतर एकट्याने फिरणे टाळावे, असे आवाहन केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी 'लोकमत'ला माहिती देताना सांगितले की, या परिसरातील १५ गावांमध्ये विद्युत पुरवठा कायम ठेवण्यासाठी महावितरणशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच, बिबट्याचा वावर पाहता गस्त वाढवून जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. एक सामान्य शेतकरी बिबट्याच्या हल्ल्याला बळी पडल्याने आता बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Farmer Killed in Leopard Attack While Protecting Livestock

Web Summary : A farmer in Beed was tragically killed by a leopard while tending to his livestock. The attack occurred in the Bavi Darewadi area of Ashti Taluka. Authorities are urging caution and increasing patrols. The incident has sparked fear and grief in the village, prompting calls for immediate action.
टॅग्स :Beedबीडleopardबिबट्याFarmerशेतकरी