शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बीड पीकविमा मॉडेलची दिल्लीत चर्चा; शेतकरी मात्र तोट्यातच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 10:29 IST

Beed : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि निसर्गाचा असमतोल यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेत राज्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतात. त्यामुळे बीडचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साली केला होता.

- प्रभात बुडूख

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बीडचे पीकविमा मॉडेल सगळीकडे राबवावे, अशी विनंती केली. त्यामुळे बीडचे पीकविमा मॉडेल चर्चेत आले आहे.    जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि निसर्गाचा असमतोल यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेत राज्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतात. त्यामुळे बीडचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साली केला होता. मात्र, शेतकऱ्यांना मिळणारा नगण्य परतावा लक्षात घेऊन विमा कंपन्यांची नफेखोरी टाळण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने विशेष आदेश पारीत केले. बीड जिल्हा प्रशासनाने राबविलेले हे मॉडेल सर्वत्र लागू करावे, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांकडे केली. कंपनी तोट्यात जात असल्याची ओरड करत २०१९च्या खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विमा घेण्यास कुठलीही पीकविमा कंपनी तयार नव्हती. त्यामुळे २०२०च्या खरीप हंगामात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे सतत पाठपुरावा करून भारतीय विमा कंपनीशी तीन वर्षांचा करार करत नवा पॅटर्न बीड जिल्ह्यात राबवला. हा पॅटर्न राज्यात केवळ बीडपुरताच मर्यादित होता.  बीडचे शेतकरी तरीही तोट्यातच !२०२० खरीप हंगामात भारतीय कृषी विमा कंपनीकडे १७ लाख ९० हजार शेतकऱ्यांचे ६० कोटी तसेच केंद्र व राज्य मिळून ७९८ कोटी रुपये भरणा केला होता. मात्र, त्यापैकी फक्त २० हजार ५३९ शेतकऱ्यांना १३ कोटी ४६ लाख रुपये भरपाई देण्यात आली. त्यामुळे मॉडेल २ नुसार कंपनीला जळपास १५९ कोटीचा नफा झाला आहे. सुमारे ६२५ कोटी रुपये शासनाकडे परत केले जाणार आहेत. मात्र, अतिवृष्टीमुळे चार लाख ३२ हजार शेतकरी बाधित झाले होते. त्यांच्या नुकसानीचा पंचनामा कृषी व महसूल विभागाने केला होता. त्यामुळे शासनाला ही रक्कम परत न करता शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या पंचनाम्याप्रमाणे विमा रक्कम अदा करावी, अशी मागणी केली जात आहे.

...तर राज्य शासन पाच कोटी अदा करेलपीकविमा कंपनीस जमा केलेला हप्ता १०० कोटी असेल आणि देय नुकसानभरपाई ११५ कोटी असल्यास भारतीय कृषी विमा कंपनी ११० कोटी नुकसानभरपाई अदा करेल, तर यासाठी राज्य शासन पाच कोटी अदा करेल. दुसऱ्या परिस्थितीमध्ये जमा विमा रक्कम १०० कोटी असेल व देय नुकसानभरपाई ७५ कोटी असल्यास भारतीय कृषी विमा कंपनी ७५ कोटी नुकसानभरपाई अदा करेल, तर २० कोटी स्वत:कडे ठेवेल. पाच कोटी राज्य शासनास परत करेल. अशा प्रकारचा पॅटर्न गेल्या वर्षीपासून राबविण्यात आला होता.     

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरी