शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे पवार, खाटोकर अजूनही मोकाट; बीडचे उमाकिरण संकुल चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:58 IST

लोक आक्रमक झालेले पाहून पाेलिसांचा फौज फाटा वाढविण्यात आला होता, तर शिक्षकांना तात्काळ बेड्या ठोका, असे म्हणत काही पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी क्लासच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

बीड : शहरातील नावाजलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांनी एका अकरावीच्या वर्गातील मुलीचा वर्षभर लैंगिक छळ केला. याप्रकरणात गुरुवारी (दि. २६) रात्री गुन्हा दाखल होताच शुक्रवारी याचे पडसाद उमटले. सकाळी ८ वाजताच पालक क्लाससमोर जमा झाले. गर्दी पाहून क्लासला सुट्टी देऊन कुलूप लावण्यात आले. लोक आक्रमक झालेले पाहून पाेलिसांचा फौज फाटा वाढविण्यात आला होता, तर शिक्षकांना तात्काळ बेड्या ठोका, असे म्हणत काही पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी क्लासच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

बीड शहरातील पांगरी रोडवर आदर्शनगर भागात उमाकिरण शैक्षणिक संकुल आहे. एकाच छताखाली फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ असे विषय शिकवले जातात. याचे वेगवेगळे संचालक आहेत. विजय पवार हा फिजिक्सचा संचालक आहे. त्याच्याकडेच प्रशांत खाटोकर हा शिक्षक होता. पवार हा केवळ आर्थिक व्यवहार पहात असे. याच दोघांनी मिळून १७ वर्षाच्या विद्यार्थिनीचा एक वर्षभर वारंवार लैंगिक छळ केला. तिला बॅड टच करत तिचे नग्न करून फोटो मोबाइलमध्ये काढले. या घटनेत गुरुवारी रात्री गुन्हा दाखल होताच जिल्हाभरात याचे पडसाद उमटले. या घटनेचा निषेध नोंदविण्यासह आरोपींच्या अटकेसाठी आंदोलनेही झाली. काहींनी अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांचीही भेट घेतली होती. त्यांनी आरोपी शिक्षकांच्या शोधासाठी तीन पथके तैनात केल्याचे सांगून लवकरच त्यांना अटक करू, असे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

क्लासची वेळ काय?सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे क्लासेस सुरू असतात. शासन शाळांची वेळ ९ करत असले तरी क्लासेसवाले मनमानी कारभार चालवत असल्याचे यानिमित्ताने चव्हाट्यावर आले.

एका विषयासाठी २२ हजार शुल्कउमाकिरण क्लासेसमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विषयाला २२ हजार रुपये शुल्क आकारले जात आहे, तर अकरावीच्या १८ हजार. एक रुपयाही हे लोक कमी घेत नाहीत. शुल्क भरायला उशीर झाला तर त्यांना क्लासमधून बाहेर काढले जाते. मुलांना अपमानित केले जात असल्याचा प्रकारही येथे होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एका वर्गात १५० विद्यार्थीया क्लासमध्ये पैसे घेऊन जनावरांसारखे विद्यार्थी काेंबून बसविले जातात. एका वेळेला एका बॅचमध्ये १५०च्या जवळपास विद्यार्थ्यांना शिकविले जाते. सर्वात मागे बसलेल्या विद्यार्थ्याला तर काहीच समजत नाही, अशाही प्रतिक्रिया शुक्रवारी ऐकायला मिळाल्या.

क्लासच्या भोवती पोलिसांचा गराडागुन्हा दाखल होताच गुरुवारी रात्रीपासूनच क्लासेसला बंदोबस्त दिला. शुक्रवारी सकाळी गर्दी जमल्याने सर्व बाजूने पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, शीतलकुमार बल्लाळ, किशोर पवार यांच्यासह १०० जवळपास अधिकारी, कर्मचारी येथे शस्त्रांसह तैनात होते.

विद्यार्थ्यांचे पैसे परत कराखासगी क्लासमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे क्लास बंद करून आमच्या मुलांची फीस परत करा, अशा प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केल्या. केवळ पवारच नव्हे इतर ठिकाणी तरी आमची मुले सुरक्षित राहतील, याची हमी काय, असा सवाल पालकांनी उपस्थित केला. त्यामुळे या सर्वच क्लासला कुलूप लावा, अशा संतप्त भावना ऐकायला मिळाल्या.

आम्ही पूर्ण सहकार्य करूउमाकिरण संकुल हे इमारतीचे नाव असून, तेथे चार विषय शिकविले जातात. अकरावी व बारावीचे विद्यार्थी आमच्याकडे आहेत. शुक्रवारी सकाळी ७ वाजताची बॅच सुरूही झाली होती. परंतु ८ वाजता प्रशासनाच्या विनंतीने सोडण्यात आली. या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. तसेच पोलिसांनी योग्य तपास करून सत्य बाहेर आणायला हवे. आम्ही पूर्ण सहकार्य करू. शैक्षणिक संकुलाची नकारात्मकता थांबवायला हवी.- प्रा.राम अबदर, संचालक, उमाकिरण संकुल (केमिस्ट्री)

पोलिस तपास करतीलअशा गंभीर प्रकरणात कोण खरे आणि कोण खोटे, यावर काहीच भाष्य करणार नाही. पोलिस योग्य तपास करतील.- प्रा. चौभारे, अध्यक्ष, प्रोफेशनल टीच असोसिएशन, बीड

विजय पवारचे नेत्यांसोबतचे फोटो व्हायरलविजय पवार याने मागील काही दिवसांत शिक्षण क्षेत्राच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. तो प्रोफेशनल खासगी क्लासेस चालवतो. शिवाय, त्याच्या इंग्लिश स्कूलही आहेत. त्याचे राजकीय नेत्यांसोबत नियमित उठ-बस असते. या घटनेनंतर त्याचे राजकीय नेते, प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते आदींसोबतचे फाेटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हेच फोटो पाहून अनेकदा पालक, विद्यार्थी शांत बसत होते, अशी चर्चा शुक्रवारी सकाळी ऐकायला मिळाली.

पोलिस ठाण्यातही जमावशिवाजीनगर पोलिस ठाण्यातही शिक्षण व इतर क्षेत्रातील लोकांचा जमाव जमला होता. प्रशांत खाटोकर हा वडवणीचा मूळ रहिवासी आहे. त्यामुळे वडवणीचे लोकही येथे जमले होते.

राजकीय पुढारी गप्प का?या प्रकरणात एकाही राजकीय नेत्याने अद्यापर्यंत अधिकृतपणे पुढे येऊन प्रतिक्रिया दिली नाही. दोन्ही आरोपी मोकाट आहेत. पीडिता आणि तिचे कुटुंब दहशतीखाली आहे. एरव्ही किरकोळ कारणांवरून आवाज उठविणारे राजकीय नेते या प्रकरणात गप्प का? असा प्रश्न आहे.

मुलींनो, पुढे या, तक्रार द्यायापूर्वीही अशाप्रकारे कोणाचा छळ झाला असेल किंवा त्रास दिला असेल तर मुलींनी पुढे येऊन सांगावे. मुली घाबरत असतील तर पालकांनी यावे. आम्ही महिला कर्मचाऱ्यांमार्फत आधार देऊन वस्तूस्थिती समजून घेऊ. मुलींची तक्रार घेऊन चौकशी करून कारवाई केली करू, असे पिंक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार लांडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडsexual harassmentलैंगिक छळEducation Sectorशिक्षण क्षेत्र