शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हाधिकारी यांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:50 IST

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर १९ रोजी मतदान होत असून यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच मतदानाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचे बाबत केलेल्या तयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांनी दिली माहिती। निरीक्षकांसह सर्व पोलीस अधिकारी उपस्थित; कडेकोट ठेवला बंदोबस्त

बीड : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर १९ रोजी मतदान होत असून यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच मतदानाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचे बाबत केलेल्या तयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती बैठक प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, निवडणूक निरीक्षक (पोलीस) बाबूलाल मीना, निवडणूक निरीक्षक प्रांजल यादव, इस्त्राइल इंगटी, सारादिन्दू चौधरी, निवडणूक खर्च निरीक्षक रवी कुमार, कल्याण रेवेल्ला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर उपस्थित होते. यावेळी विधानसभा मतदार संघाशी संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी पोलीस उपअधीक्षक तसेच सीआरपीएफ कमांडंट आणि झारखंड पोलीस विभागाचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस दला समवेत सहा मतदार संघांच्या मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी पर्यंत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या आणि झारखंडच्या ४ कंपन्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदार केंद्र निहाय बंदोबस्त आणि या भागातील पोलीस बंदोबस्ताचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच या काळात कारवाईसाठी पोलीस विभागाच्या नियोजनाची माहितीही यावेळी देण्यात आली.याप्रसंगी जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, निवडणुकीसाठी जिल्ह्यात उपलब्ध झालेले अतिरिक्त सुरक्षा दल आणि पोलीस दलाने समन्वयाने काम केले जावे. निर्देशानुसार मतदान केंद्राजवळ मतदारांना मोबाईल फोन अथवा कॉर्डलेस फोनचा वापर करण्यास व मतदान केंद्रात घेऊन जाण्यास बंदी असल्याने तेथे नियुक्त यंत्रणेने त्याबाबत काळजी घ्यावी.२३८ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग होत असून जिल्हास्तरीय वॉर रूम मधून परिस्थितीवर नियंत्रण राखले जाईल. संवेदनशील ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवून आवश्यकता भासल्यास कमीत-कमी कालावधीत तेथे पोलीस दल पोहोचवले जावे आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे सांगितले.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड